आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO गोंदिया स्थानकातील थरारक घटना:धावत्या रेल्वेतून उतरताना तरुणीचा गेला तोल; RPF जवानाने क्षणार्धात वाचवले प्राण

गोंदिया4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

म्हणतात ना..काळ आला पण वेळ आली नाही. असाच प्रकार एका पंचवीत ते तीस वयोगटातील तरुणीसोबत घडला. प्रसंग होता गोंदीया रेल्वेस्थानकातील. गाडी चालु होती पण तरुणीने याचे भान न ठेवता ती खाली उतरली, तोच तिचा तोल गेला आणि ती परत रेल्वे आणि प्लॅटफार्मच्यामध्ये जात होती हे पाहताच आरपीएफ जवानाने या महिलेचा जीव वाचवला. या जवानाच्या रुपात तिला जणू देवदुतच भेटला.

असा धोका पत्करू नका

चालत्या रेल्वेतून पडून मृत्यूमुखी पडल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या आहेत, पण जीवावर उदार होत मृत्यूच्या दाढेत जाणाऱ्या लोकांना वाचवण्याचे काम आरपीएफ जवानांनी केले आहे. गाेंदीया स्थानकात जवानाने सतर्कता बाळगून तरुणीचे प्राण वाचवले. यापाठोपाठ दुसरा जवान व काही नागरीक धावले आणि दोघांनाही सावरल्याचे व्हिडीओत दिसते. तरुणीला वाचवणाऱ्या जवानाचे कौतुक होत आहे, पण रेल्वेनेही असे प्रकार टाळण्यासाठी लोकांना सल्ला दिला आहे.

रेल्वे प्रशासनाकडून व्हिडीओ ट्विट

रेल्वे मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर या प्रसंगाचा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. या अपघाताचे गांर्भियच रेल्वेप्रशासनाने जनतेला दाखवून दिले आहे. त्यांनी असे प्रकार घडत असताना सतर्क राहण्याच्या सूचनाही प्रवाशांना दिल्या आहेत.

काय आहेत सूचना?

आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे एका महिलेचा जीव वाचला! महाराष्ट्रातील गोंदिया जंक्शन येथे चालत्या ट्रेनमधून उतरताना एका महिलेचा तोल गेला, तिला तेथे तैनात असलेल्या दक्ष आरपीएफ जवानांनी वाचवले. सर्वांना विनंती आहे की, चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा, उतरण्याचा प्रयत्न करू नका, ते घातक ठरू शकते.

बातम्या आणखी आहेत...