आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

59 दिवसांनंतर:लाॅकडाऊनचे दार आता किलकिले; नाॅन रेड झोनमध्ये व्यवहार होणार सुरू

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सकाळी 9 ते 5 दुकाने, बाजारपेठा खुल्या राहणार
  • महाराष्ट्राबाहेर जाणाऱ्या प्रवाशांनाच करता येईल सचखंड एक्स्प्रेसमध्ये तिकीट आरक्षण

नाॅन रेड झोन भागातील नागरिकांसाठी अखेर ५९ दिवसांनंतर शुक्रवारपासून लाॅकडाऊनचे दार किलकिले होणार आहे. शुक्रवारपासून या ठिकाणी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दुकाने, बाजारपेठा खुल्या राहणार असून शासकीय कार्यालयांमध्येही १०० टक्के उपस्थिती राहणार आहे. त्याशिवाय राज्याची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या एसटी बससेवेलाही जिल्ह्यांतर्गत सुरुवात होणार आहे.

राज्य शासनाने लाॅकडाऊन ४.० साठी नवी नियमावली जारी करून व्यवहार हळूहळू पूर्वपदावर आणण्याच्या दृष्टीने रेड झोन आणि नॉन रेड झोन असे दोनच भाग करण्याचे जाहीर केले. रेड झोन आणि कंटेनमेंट झोन वगळता अन्य ठिकाणी जिल्ह्यांतर्गत (जिल्ह्याच्या सीमेपर्यंतच) एसटी बसेस चालवण्यात येणार आहेत. त्यासाठी पूर्वीप्रमाणे नियमित भाडे राहील. सकाळी ७ ते संध्याकाळी ७ पर्यंत ही एसटी सेवा सुरू राहणार आहे. ५० टक्के प्रवाशांना घेऊनच बसेस रवाना केल्या जाणार असल्याची माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली.

५० टक्के प्रवाशांसह जिल्ह्यांतर्गत एसटी सेवा, नियमित भाडे घेणार

> प्रवासादरम्यान घेण्यात येणार काळजी

> सर्व बसेस योग्य सॅनिटायझरचा वापर करून निर्जंतुक केलेल्या असतील

> प्रवाशांकडून पूर्वीप्रमाणे नियमित भाडे घेतले जाणार आहे.

> फिजिकल डिस्टन्सिंगचा वापर करून केवळ ५० % प्रवाशांनाच प्रवेश > ज्येष्ठ नागरिक व १० वर्षांखालील लहान मुलांना बस प्रवासाची परवानगी नाही. > प्रत्येक प्रवाशाने व एसटी कर्मचाऱ्याने प्रवास सुरू करताना सॅनिटायझरने आपले हात निर्जंतुक करणे आवश्यक.

> प्रत्येक प्रवासी व एसटी कर्मचाऱ्याने तोंडाला मास्क लावणे आवश्यक.

कृपा करून हा नियम पाळाच...

आता प्रत्येकाला फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे अत्यंत आवश्यक असून गर्दी टाळण्याच्या-दृष्टीने पोलिसांनाही सतर्क राहावे लागणार आहे.

हे आहेत रेड झोनमध्ये :

औरंगाबाद, नाशिक, मालेगाव, जळगाव, धुळे, अकोला, अमरावती, पुणे, मुंबई व एमएमआरडीएतील सर्व महापालिका क्षेत्र. या ठिकाणी मनपाहद्दीबाहेर एसटी धावतील.

महाराष्ट्राबाहेर जाणाऱ्या प्रवाशांनाच करता येईल सचखंड एक्स्प्रेसमध्ये तिकीट आरक्षण

औरंगाबाद | केंद्राने दोनशे रेल्वे चालवण्याची घोषणा केली असून त्यात हुजूरसाहिब नांदेड ते अमृतसर (गाडी क्र. १२७१५) आणि अमृतसर ते नांदेड (१२७१६) या रेल्वेचा समावेश आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे राज्यातील एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासाची परवानगी नाकारली आहे. त्यामुळे १ जूनपासून सचखंड एक्स्प्रेसमध्ये महाराष्ट्रातील एका स्थानकावरून राज्याच्या दुसऱ्या स्थानकापर्यंत प्रवास करता येणार नाही. अमृतसरहून निघाल्यानंतर इतर राज्यांतून महाराष्ट्रात येता येईल, परंतु येतानाही राज्यातील एका स्थानकाहून दुसऱ्या स्थानकापर्यंत प्रवास करता येणार नाही, असे नांदेडचे विभागीय व्यवस्थापक उपिंदरसिंग यांनी सांगितले.

इतर राज्यांसाठी १ जूनपासून आरक्षण

नांदेड येथून निघाल्यानंतर पूर्णा, परभणी, जालना, औरंगाबाद, मनमाड, भुसावळ हे महाराष्ट्रातील थांबे आहेत. महाराष्ट्रानंतरचा पहिला थांबा हा मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील आहे. १ जूनपासून सचखंडमध्ये महाराष्ट्रातील थांब्यांवरून इतर राज्यासाठी प्रवाशांना तिकीट आरक्षण मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...