आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालोकसभेच्या काही जागा आम्ही निवडल्या आहेत, निवडणुकीवर आम्ही अधिक लक्ष केंद्रीत करीत आहोत. महाराष्ट्राच्या जागेसंदर्भात समिती स्थापन केली आहे. भाजपने यापुर्वी 42 जागा जिंकल्या आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील 48 मतदार संघात आम्ही ताकदीने लढणार आहोत, पण त्याशिवाय आम्ही शिवसेनेच्या मतदारसंघावरही लक्ष केंद्रीत करणार आहोत अशी माहिती राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. भाजपची लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने आज बैठक झाली त्यानंतर ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.
अठरा महिन्यांची रणनीती
भाजपचे हे नियमित काम आहे. हे आमचे मिशन आहे. 2014 च्या निवडणुकीनंतरही आम्ही अशाच पद्धतीने स्ट्रॅटर्जी ठरवली होती. केवळ निवडणूक म्हणूनच नव्हे तर सातत्याने अशी तयारी करायला हवी. लोकांना लाभ मिळावा त्यांच्यापर्यंत योजना कशा पोहचतील याबाबतही आम्ही नियोजन करीत आहोत. पुढील अठरा महिण्यांची रणनिती आखली आहे, असेही ते म्हणाले.
आज झालेल्या बैठकीत स्ट्रॅटर्जी ठरवण्यात आली आहे. दौरा, नियमावली, प्लॅनिंगबाबत आम्ही नियोजन केले आहे. अनेक मंत्र्यांना कामे दिली गेली आहे. राज्यातील मंत्र्यांनाही देशभरातील मतदारसंघात कामे दिली गेली आहे. लोकसभा निवडणूक हे भाजपचे मिशन आहे असेही ते म्हणाले.
काँग्रेसचे आंदोलन चुकीचे
काॅंग्रेसचे आंदोलन चुकीचे आहे. ईडीने सुरू केलेली चौकशी योग्य आहे. भ्रष्टाचार करण्याचे लायसन या देशात कुणाकडेच नाही. काँग्रेस न्यायालयावर दबाव आणण्याचे काम करीत आहे असा आरोपही फडणवीस म्हणाले.
इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यावर फडणवीस म्हणाले की, इम्तियाज जलील उघडे पडले असून ते काय म्हणतात त्यावर विचार करण्याची गरज नाही. भाजप कुठल्याही व्यक्तीला टार्गेट करून निवडणूक लढवत नसून त्यांचा उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहे.
आम्ही जो ठरवू तोच उमेदवार निवडून येणार
राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवण्याचा शरद पवार यांचा व्यक्तीगत निर्णय आहे, असे ते म्हणाले. त्यांनी तब्येतीचे कारणही सांगितले आहे.
नियमित सैन्यभरती सुरूच राहील
फडणवीस म्हणाले, फार थोड्या लोकांनी अग्निपथ योजनेला विरोध केला, ज्यांनी या योजनेला विरोध केला त्यांनी गैरसमजूतीतून विरोध केला. त्यांना ती योजना समजलीच नाही. भारतीय लष्करात भरती सुरुच राहील ती बंद केलेली नाही, अग्निपथ योजनेची भरती ही अतिरिक्त आहे, त्यातून सैनिकीबाणा लक्षात यावा अशी त्यामागील भूमिका केंद्र सरकारची आहे असेही फडणवीस ्म्हणाले.
अजित पवारांविरोधात षडयंत्र?
अजित पवार आणि पंतप्रधान मोदी मनमोकळे बोलत होते. अजित पवार यांचे नाव नसल्याचे पाहून पंतप्रधानांनीही आश्चर्य व्यक्त केले होते. मोदी आणि पवार मनमोकळे बोलत होते हेच काही लोकांना हे सर्व पाहावत नाही. चांगला कार्यक्रम झाल्यानंतरही त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जात आहे मला वाटते की, हे अजित पवारांविरोधात षडयंत्र आहे हा माझा कयास असल्याचेही ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.