आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • The Maharashtra Bhushan Award Is An Appreciation From My Family: Asha Bhosle; Congratulations To Ashatai From Cultural Affairs Minister Amit Deshmukh; News And Live Updates

मुंबई:महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार म्हणजे माझ्या घरच्यांकडून झालेले कौतुक : आशा भोसले; सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्याकडून आशाताईंचे अभिनंदन

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आशा भोसले यांना ‘सुवर्णरंग’हे पुस्तक भेट देताना अमित देशमुख.

सन २०२१ चा प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार अष्टपैलू गायिका आशा भोसले यांना जाहीर करण्यात आला आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी गुरुवारी यानिमित्त आशाताईंच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन अभिनंदन केले. ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार म्हणजे घरच्यांकडून झालेले कौतुक आहे, या शब्दांत आशा भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

अमित देशमुख यांनी गुरुवारी सकाळी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची त्यांच्या लोअर परळस्थित निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या वेळी संगीतकार राहुल रानडे यांच्यासह सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

... हा तर माझ्या मातीने केलेला गौरव
महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार वेगळा आहे. कारण हा माझ्या मातीने केलेला माझा गौरव आहे. हा पुरस्कार जाहीर होणे म्हणजे घरच्यांकडून माझे कौतुक झाले आहे असे मी मानते.सध्या राज्यात कोरोना संसर्गाचे संकट आहे. ते अजूनही संपलेले नाही. दुसरीकडे गेल्या आठवड्यात चिपळूण, सांगली, कोल्हापूर येथे अतिवृष्टीमुळे बरीच जीवित व वित्तहानी झाली. त्यामुळे राज्यातील परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर सन्मान सोहळा आयोजित करावा, अशी विनंती आशाताईंनी मंत्र्यांना केली.

बातम्या आणखी आहेत...