आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियोजन:राज्यातील वैद्यकीय पदवी, पदव्युत्तर परीक्षा 15 जुलैपासून प्रारंभ होणार

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वैद्यकीय शिक्षण विभागाच्या दिलेल्या तीन पर्यायांना राज्यपालांची मंजुरी
  • शिवसेनेला जमले नाही ते काँग्रेसने करून दाखवले

काेरोना प्रादुर्भाव ओसरल्यानंतर राज्यातील पदवी व पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखांच्या परीक्षा जुलै १५ पासून घेण्यात येतील, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी कुलपती तथा राज्यपाल यांना दिली आहे. कुलपती यांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने प्रस्तावित केलेल्या परीक्षेसंदर्भातील तीन पर्यायांच्या आराखड्याला मंजुरी दिली आहे, असे राजभवनने काढलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी गुरुवारी राज्यपालांची भेट घेऊन राज्यपालांना आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे तयार करण्यात आलेला वैद्यकीय परीक्षा घेण्याबाबतचा विस्तृत आराखडा सादर केला होता. विद्यापीठाने परीक्षा घेण्यासंदर्भात केलेल्या नियोजनाचे या वेळी राज्यपालांनी कौतुक केले. राज्यपालांना दिलेल्या पत्रामध्ये देशमुख यांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परीक्षा घेण्यासंदर्भात तीन पर्याय तयार केले असल्याचे सांगितले. पहिल्या प्रस्तावानुसार परिस्थिती अनुकूल असल्यास सर्व लेखी परीक्षा १५ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत घेण्यात येतील.

सर्व पदवी विद्याशाखांच्या परीक्षा

१. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखेच्या एमडी, एमएस पदव्युत्तर दंत, आयुर्वेद, होमिओपॅथी, परिचर्या व तत्सम तसेच सर्व पदवी विद्याशाखांच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत.

२. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून परीक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

३. जुलै १५ पासून वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शक्य न झाल्यास परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल.

म्हणून अमित देशमुख राजभवनावर... : अकृषक विद्यापीठांच्या पदवी व पदव्युत्तर वर्गाच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रद्द केल्या होत्या. त्याला कुलपती यांनी आक्षेप घेतला आहे. ते पाहून मंत्री अमित देशमुख यांनी राज्यपालांची भेट घेऊन आपल्या विभागाचा वाद टाळला आहे.

बातम्या आणखी आहेत...