आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सीरो सर्व्हेमध्ये खुलासा:मुंबईत कोरोना पसरण्यामागचे मुख्य कारण आले समोर; जाणून घ्या मनपाचा सीरो सर्व्हे काय सांगतो..?

मुंबई(विनोद यादव)20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना संक्रमण झाल्यानंतरही अनेकांना समजले नाही

महाराष्ट्रात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांबाबत एक मोठा खुलासा झाला आहे. मुंबई महानगरपालिके (BMC) कडून शनिवारी तिसरी सीरो सर्व्हे रिपोर्ट जारी करण्यात आली आहे. सीरो सर्व्हेमध्ये एकूण 10,197 लोकांच्या रक्ताच्या चाचण्या घेण्यात आल्या. यातील एकूण 36.30% म्हणजेच 3,702 लोकांमध्ये सीरो पॉजिटिव्ह आढळले आणि त्यांच्या शरीरात IGG अँटीबॉडी तयार झाल्या होत्या.

सार्वजनिक आरोग्य विभागाचे जानकार आणि आर्मीचे माजी माजी डेप्युटी डायरेक्टर, हेल्थ सर्व्हिसेजचे कर्नल डॉ. सतीश ढगे यांनी सांगितले की, मुंबईतील 36.30% लोकांमध्ये कोरोना लस घेतल्याशिवाय अँटीबॉडी तयार होणे गंभीर आहे. असे असू शकते की, ज्या लोकांचे सँपल घेण्यात आले होते, त्यातील अनेकांना कोरोना झाल्यावरही समजले नाही. किंवा काही लोकांना समजले आणि त्यांनी घरगुती/सामान्य उपचार करुन कोरोना बरा केला.

ढगे पुढे सांगतात की, सर्व्हेमध्ये जे असिम्प्टोमेटिक लोक होते, त्यांच्यामुळे अनेकांना कोरोनाची लागण झाली असेल. महाराष्ट्राच्या कोरोना टास्ट फोर्सच्या रिपोर्टनुसार एक कोरोना संक्रमित व्यक्ती हजारो लोकांना संक्रमित करू शकतो. डॉ. ढगे यांच्या दाव्यांवरुन हिरानंदानी हॉस्पीटल (पवई)चे डॉक्टर नीरज तुलारा सांगतात की, कोरोना संक्रमण असलेला एक व्यक्ती दिवसभरातून कमीत-कमी 15-20 लोकांना संक्रमित करू शकतो.

कोरोनाची साखळी अशाच पद्धतीने वाढत आहे

डॉक्टर नीरज यांनी पुढे सांगितले की, अशाप्रकारे कोरोना संक्रमितांची संख्या वाढत आहे. मुंबई शहरात अंदाजे 20% लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळेच अशा लोकांना अधिक काळजी घेण्याची गरज आहे. डॉक्टर नीरज यांनी पुढे सांगितले की, जर मुंबई मनपाच्या मार्च महीन्यात झालेल्या सीरो सर्व्हेमध्ये 10,197 लोकांपैकी 36.30% लोकांमध्ये अँटीबॉडी आढळली आहे, तर हे लोक कळत-नकळत लाखो लोकांना भेटले असतील. या कारणामुळेच कोरोना व्यक्तीचे कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग करुन त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांच्या चाचण्या करणे महत्वाचे आहे.

मुंबई कधी झाला सीरो सर्व्हे

जुलै 2020 ला पहिला सीरो सर्व्हे मुंबईतील तीन विभागात झाला. यानंतर ऑगस्ट 2020 ला दुसरा सीरो सर्व्हे पुन्हा मुंबईतील तीन विभागात झाला. मार्च 2021 ला तिसरा सीरो सर्व्हे करण्यात आला. तिसऱ्या सीरो सर्व्हेमध्ये एकूण 10,197 जणांच्या ब्लड सँपलच्या टेस्टिंग रिपोर्टमध्ये मुंबईतील एकूण 36.30% म्हणजेच 3,702 लोकांमध्ये सीरो पॉजिटिव्ह आढळले होते.

बातम्या आणखी आहेत...