आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरेगाव भीमा प्रकरण:राष्ट्रवादीचे नेतेच संभाजी भिडेंच्या पाया पडतात, त्याच नेत्यांनी भिडेंना वाचवण्याचा प्रयत्न केला -प्रकाश आंबेडकर

मुंबई16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

''राष्ट्रवादीचे अनेक नेते संभाजी भीडे यांच्या पाया पडतांना दिसतात. जो माणूस संभाजी भीडे यांच्या पाया पडतो, त्याच व्यक्ती संभाजी भीडे यांना वाचावण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचा भीमा कोरेगाव आयोगासमोर आज जबाब नोंदवण्यात आला. हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी क्लिनचीट दिली. त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टिकास्त्र सोडले.

प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले की, शरद पवारांनी कोरोगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील सर्व कागदपत्रे आयोगासमोर सादर करावीत. तसेच अधिकाऱ्यांना नंतर वाचावायला कोणीही येणार नाही, त्यामुळे त्यांनी आत्ताच खरे काय आहे ते सांगावे, असे वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले.

शदर पवारांनी कोरोगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील सर्व कागदपत्रे आयोगासमोर सादर करावीत. तसेच अधिकाऱ्यांना नंतर वाचावायला कोणीही येणार नाही, त्यामुळे त्यांनी आत्ताच खरे काय आहे ते सांगावे, असे वंचित बहूजन आघाडीजे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले.

पक्षातील नेते शरद पवारांचे ऐकत नाही का?

राष्ट्रवादीतील काही नेते संभाजी भीडे यांच्यासोबत दिसले आहेत. तसेच गृहखाते राष्ट्रवादीकडे आहे. त्याच पार्श्वभूमीवर भीडेंना क्लीनचीट मिळाली असे सांगण्यात आले. राष्ट्रवादीचे नेते भीडे यांना वाचवायचा प्रयत्न करीत आहे पण तेच नेते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ऐकत नाही काय असा सवालही आंबेडकरांनी उपस्थित केला.

काय आहे प्रकरण
1 जानेवारी 2018 रोजी पुण्यातील कोरेगाव भीमा हिंसाचार झाला होता. यात एकाचा मृत्यू झाला होता. 10 पोलिसांसह अनेक जण जखमी झाले होते. पुण्यात भरवण्यात आलेली एल्गार परिषद व त्यातील चिथावणीखोर भाषणांमुळेच कोरेगाव भीमात हिंसाचार उसळल्याचा तेव्हा ठपका ठेवण्यात आला होता.

बातम्या आणखी आहेत...