आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरक्षणावरून गदारोळ:मराठा आरक्षणाचा कायदा फुलप्रूफ होता, मग स्थगिती कशी दिली? मंत्री अशोक चव्हाण यांचा विरोधकांना सवाल

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मराठा आणि ओबीसीत विरोधक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप

मराठा आरक्षण कायदा फुलप्रूफ आहे. या कायद्याला कोणताही अडथळा येणार नाही, असे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत होते. हा कायदा इतका फुलप्रूफ होता तर सर्वोच्च न्यायालयात टिकला का नाही, असा सवाल राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी विरोधकांना केला.

विधानसभेत पुरवणी मागण्यांवर मंगळवारी सुरू असलेल्या चर्चेत भाग घेताना चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांना हा सवाल केला. फडणवीस यांनी मराठा आरक्षणासाठी फुलप्रूफ कायदा आणू म्हणून सांगितले होते. या कायद्यामुळे काहीच अडचण येणार नसल्याचा दावाही त्यांनी केला होता. तुमचा कायदा एवढाच फुलप्रूफ होता तर सर्वोच्च न्यायालयात तो टिकला का नाही, असा सवाल करतानाच “आम्ही तर तुम्ही आणलेला आरक्षण कायदा मान्य केला. त्यावर चर्चाही केली नाही आणि आक्षेपही घेतला नव्हता,’ असे चव्हाण म्हणाले.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी तत्कालीन फडणवीस सरकारने नेमलेले वकील सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडत आहेत. एकूण नऊ ते दहा निष्णात वकील हा खटला लढवत आहेत. पण काही ना काही मुद्द्यांवर विषय अडत आहे. पण आम्ही कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही. आता या प्रकरणावर न्यायालयात दररोज सुनावणी होणार असून या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय हे सरकार स्वस्थ बसणार नाही, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. सरकार कुणाचे आहे हे महत्त्वाचे नाही. आपण सर्वांनी मिळून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कंबर कसली पाहिजे. आजच्या परिस्थितीत काय केले पाहिजे याचा सर्वांनीच विचार केला पाहिजे.

गोबेल्स नीती वापरून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न

काही लोक मात्र गोबेल्स नीती वापरून मराठा आरक्षणावरून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा टोला चव्हाण यांनी लगावला. ओबीसींचे आरक्षण कायम राहणार असल्याचे चव्हाण या वेळी म्हणाले. ओबीसी आरक्षणाबाबत काही वेगळा विचार नाही. इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणात काही फरक पडणार नाही. पण काही लोक ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. विधान परिषदेच्या निकालानंतर खासकरून मराठा विरुद्ध ओबीसी असे वातावरण निर्माण केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser