आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • The Market Rallied On The Strength Of Select Stocks, Bouncing In Only 5 Percent Of Shares

उसळीत भेदभाव:निवडक शेअर्सच्या बळावर बाजारात तेजी, केवळ 5 टक्के शेअर्समध्ये उसळी; निफ्टी 200 च्या शेअर विश्लेषणातून चकित करणारा कल समोर

मुंबई (अक्षय चिंचाळकर/ आशुतोष जोशी)2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सलग दुसऱ्या दिवशीवाढ; ४०३ अंक वधारला सेन्सेक्स

देशातील शेअर बाजार सलग नवी उंची गाठत आहे आणि जागतिक बाजारापेक्षा चांगली कामगिरी करत आहे. मात्र, ही वाढ मोठ्या प्रमाणात ५% शेअर्सपर्यंतच मर्यादित आहे. उर्वरितमध्ये एक तर घसरण आहे किंवा नाममात्र तेजी आहे. यापुढे आणखी तेजी कठीण असल्याचा अंदाज विश्लेषकांचा आहे. अलीकडच्या आठवड्यांत बाजाराची चाल बरीच रंजक राहिली. बाजार भांडवल आणि मूल्याच्या हिशेबाने निफ्टी २०० निर्देशांकाच्या १० मोठ्या शेअर्सनी या महिन्यात आतापर्यंत उर्वरित १९० शेअर्सच्या तुलनेत ७% जास्त चांगली कामगिरी केली आहे. निफ्टी २०० निर्देशांक मार्च २०२० च्या नीचांकी पातळीपेक्षा सुमारे दुप्पट उंचीवर पोहोचला आहे. मात्र, ऑगस्टच्या सुरुवातीपासून मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये घसरण नोंदली जात आहे. याचा अर्थ केवळ मोठ्या कंपन्यांचे(ब्ल्यूचिप) काही शेअर बाजाराला सलग नव्या उंचीवर घेऊन जात आहेत.

तेजीचे हीरो स्मॉलकॅप-मिडकॅप मंदावले
1. मार्च २०२०

लॉकडाऊनमुळे बाजार नीचांकी पातळीवर आला. यानंतर रिझर्व्ह बँकेने रोकड वाढवली. अशात मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सनी चांगली कामगिरी केली.
2. जुलै २०२१
मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये घसरण सुरू झाली. तेजी मोठ्या कंपन्यांवर अवलंबून राहिली.आयटी, बँकिंग व एनएबीएफसीच्या शेअरचा यात समावेश आहे.

मिडकॅपमधून लार्जकॅपमध्ये पैसा जातोय
एमके ग्लोबल फाय. सर्व्हिसेसचे एस. हरिहरन म्हणाले, सध्या लार्जकॅप शेअर्समध्ये मिडकॅपच्या तुलनेत जास्त गुंतवणूक होत आहे. कॅपिटलव्हाया ग्लोबल रिसर्चचे प्रमुख गौरव गर्ग म्हणाले, स्मार्ट गुंतवणूकदार व ट्रेडर मिडकॅपमधील पैसा लार्जकॅपमध्ये गुंतवणूक करताहेत.

सलग दुसऱ्या दिवशीवाढ; ४०३ अंक वधारला सेन्सेक्स
मुंबई| बँक शेअर्स आणि रिलायन्सच्या नेतृत्वाखाली निघालेल्या खरेदीच्या जोरावर मंगळवारी देशाचे शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी वाढीत बंद झाले. बळकट जागतिक संकेतांमध्ये सेन्सेक्स ४०३.१९ अंकांच्या वाढीसह ५५,९५८.९८ च्या विक्रमी पातळीवर बंद झाला. एनएसई निफ्टीत १२८.१५ अंकांची तेजी राहिली. हा १६,६२४.६० च्या विक्रमी पातळीवर बंद झाला. व्यवसायादरम्यान सेन्सेक्सने पुन्हा एकदा ५६ हजारांची पातळी स्पर्श केली. निफ्टीने १६,६४७.१० ची नवी उंची स्पर्श केली.

बातम्या आणखी आहेत...