आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:कोरोनाग्रस्तांसाठी मालाडच्या व्यापाऱ्याने दिली आपली 19 मजली इमारत, मनपाने बनवले कोरोना सेंटर

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मालाड, कांदिवली, बोरीवली आणि दहिसरमध्ये सध्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे

शहरातील कोरोना हॉट स्पॉट राहिलेल्या धारावी, वरळी कोळीवाडा आणि बीडीडी चाळीसारख्या परिसरात आता परिस्थिती नियंत्रणात येत होती, पण आता पश्चिम उपनगरातील मालाड परिसरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 19 दिवसात दुप्पट होत आहे. अशा स्थितीत येथील स्थानिक व्यापारी मेहुल संघवी यांनी आपली 130 फ्लॅट असलेली नवीन इमारत मुंबई मनपाला अस्थायी कोरोना हॉस्पीटल बनवण्यासाठी दिली आहे.

300 रुग्णांवर उपचार सुरू, एका फ्लॅटमध्ये 4 रुग्णां ठेवता येते

मालाडचे सहाय्यक मनपा आयुक्त संजोग कबरेने सांगितले की, श्रीजी शरण डेव्हलपर्सचे मालक मेहुल संघवी यांनी मनपाला जी 19 मजली इमारत दिली आहे. यात आता 500 रुग्णांचा उपचार सुरू झाला आहे. प्रत्येक फ्लॅटमध्ये चार रुग्णांना ठेवण्यात आले आहे. ते म्हटले की, अशा परिस्थितीत आपली इमारत कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी देणे कौतुकास्पद आहे.

भाजप खासदाराची अनोखी मोहिम

पश्चिम उपनगरातील विशेषकर उत्तर मुंबईअंतर्गत मालाड, कांदिवली, बोरीवली आणि दहिसर परिसरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. येथील शताब्दी (कांदिवली) आणि ट्रामा (जोगेश्वरी) हॉस्पीटलमधील बेड्स आधीपासूनच फूल असल्याने उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्‌टी यांनी आपल्या क्षेत्रातील बिल्डरांना इमारती कोरोना सेंटरसाठी देण्याची अपील केली. त्यांच्या अपीलवर मालाडचे व्यापारी मेहुल संघवी यांनी 19 मजली इमारत मनपाला दिली.

बातम्या आणखी आहेत...