आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

राजकारण:तुमच्या पक्षातील आमदार हा तुमच्यासाठी विकाऊ वस्तू असेल; प्रवीण दरेकर यांची काँग्रेसवर टीका

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • निराधार वक्तव्ये करण्याची स्पर्धा काँग्रेसमध्ये लागल्याची शंका - दरेकर

तुमच्या पक्षाच्या माध्यमातून निवडून आलेला आमदार हा विकला जातो, तुमच्यासाठी तो विकाऊ वस्तू आहे, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काँग्रेसवर केली. तसेच काँग्रेसच्या नेत्यांची अलीकडच्या काळात जी वक्तव्ये होत आहेत ती कोरोनामध्ये महाराष्ट्र सरकारला आलेल्या अपयशापासून लक्ष विचलित करण्यासाठी आहेत, असेही ते म्हणाले.

राजस्थानमधील घोडेबाजाराच्या राजकारणासाठी महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी ५०० कोटी रुपयांचा निधी गोळा करून दिला, या काँग्रेसच्या आरोपानंतर भाजप नेते आक्रमक झाले आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर हा आरोप केला होता. सावंत यांचा आरोप अत्यंत बिनबुडाचा आणि तथ्यहीन आहे, असा आरोप करणाऱ्यांना सांगणे आहे की, आमदार हे लोकप्रतिनिधी असतात. तुमच्या पक्षाच्या माध्यमातून निवडून आलेला आमदार हा विकला जातो, तुमच्यासाठी तो विकाऊ वस्तू असेल. कधी भाजप सरकार पाडतेय, कधी राजस्थानला मदत करतोय, अशा प्रकारची निराधार वक्तव्ये करण्याची स्पर्धा काँग्रेसमध्ये लागल्याचे शंका येत असल्याचे दरेकर यांनी म्हटले आहे.

बिनबुडाचे आरोप करून सचिन सावंत आपल्या वरिष्ठांना खुश करू शकतात, राजकीय स्पर्धेत काही मिळवण्यासाठी त्यांना या सगळ्याचा उपयोग होईल. तसेच विधान परिषदेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे सावंत अशा प्रकारची वक्तव्ये करत असतील. परंतु, अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे जनतेमध्ये आपली प्रतिमा ही बिनबुडाचे आरोप करणारा प्रवक्ता अशी होईल याचे भान असावे. म्हणूनच यांच्यासारख्या होतकरू नेत्याने बोलताना काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असा सल्लाही दरेकर यांनी दिला.