आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरेंच्या पत्राची केंद्राकडून दखल:​​​​​​​मनसे अध्यक्षांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार, म्हणाले - असेच सहकार्य राहिले तर एकत्रितपणे संकटावर सहज मात करू

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींचे आभार मानले.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दरम्यान अनेक राज्यांमध्ये लसींचा तुटवडाही जाणवत आहे. यासाठीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्हॅक्सिनची संख्या वाढण्यासाठी हाफकीन सारख्या संस्थांना व्हॅक्सिनच्या उत्पादनाची परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. ती मागणी मान्य करण्यात आली आहे. यानंतर राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहे.

राज ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींचे आभार मानले. ते म्हणाले की, '100% लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हाफकिन्ससारख्या संस्थेला लस उत्पादन करण्याची मुभा द्यावी ह्या माझ्या विनंतीला आपण मान्यता दिलीत ह्याबद्दल पंतप्रधानांचे मनापासून आभार. केंद्रसरकारकडून असेच सहकार्य मिळत राहिल्यास एकत्रितपणे आपण ह्या संकटावर सहज मात करू हे नक्की.'

भारत बायोटेक कंपनीची ‘कोव्हॅक्सिन’ लस बनवण्यास केंद्र सरकारने राज्याच्या हाफकिन संस्थेस मान्यता दिली आहे. केंद्र शासनाने ही परवानगी दिल्याने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन सुरू होऊ शकते, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने ही लस बनवण्यास केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली आहे. यासंदर्भात या प्रकल्पावर नियमित देखरेख करण्यासाठी व निर्धारित एक वर्षाच्या आत उत्पादन पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत.

‘कोव्हॅक्सिन बनवण्यास 1 वर्षाचा कालावधी दिला आहे. हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशन आणि हैदराबाद येथील भारत बायोटेक यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत कोविड लसीचे उत्पादन करण्यात येणार आहे. त्यासाठी 154 कोटी रुपये खर्चाचा नवीन उत्पादन प्रकल्प मुंबईत सुरू करण्याचे नियोजन केले आहे. हाफकिनमार्फत एप्रिल 2021 ते मार्च 2022 पर्यंत अंदाजे 12 कोटी 60 लाख लसी निर्माण करण्याची क्षमता आहे.

बातम्या आणखी आहेत...