आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील नायब तहसीलदारांनी संप मागे घेण्यास नकार दिला आहे. सरकारने ठोस निर्णय केल्याशिवाय संप मागे घेणार नाही, असे महाराष्ट्र राज्य तहसीलदार-नायब तहसीलदार संघटनेचे कार्याध्यक्ष सुरेश बगळे यांनी बुधवारी (५ एप्रिल) प्रसिद्धी माध्यमांंना सांगितले. आज मंत्रालयात नायब तहसीलदार राजपत्रित वर्ग २ यांच्या ग्रेड पेबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर आणि महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचे सदस्य उपस्थित होते. बैठकीनंतर महसूलमंत्री विखे-पाटील म्हणाले, नायब तहसीलदार हे महसूल विभागातील महत्त्वाचे आणि जबाबदारीचे पद आहे. त्यांच्या कामाचा पूर्वेतिहास पाहता शासन त्यांच्या मागणीबाबत नैसर्गिक न्यायतत्त्वाचा अवलंब करीत आहे. त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी यापूर्वीच कार्यवाही सुरू केली असून लवकरच याबाबत निर्णय होईल, असेही मंत्री विखे-पाटील यांनी आश्वासित केले. ३५८ तालुक्यांत २२०० नायब तहसीलदार सध्या संपावर आहेत.
इतर अधिकाऱ्यांकडे कार्यभार देण्याचा विचार संप लवकर मागे न घेतल्यास महसूलची कामे ठप्प होऊ शकतात. त्यामुळे इतर अधिकाऱ्यांकडे नायब तहसीलदारांचा कार्यभार देण्याचा विचार महसूल विभागात सुरू आहे. नायब तहसीलदार पदाचे वेतन राजपत्रित वर्ग २ चे नसल्याने संघटनेने नायब तहसीलदार यांचे ग्रेड पे वाढविण्यासाठी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.