आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल मुंबईत:राज्यपाल कोश्यारी, मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि रजनीश शेठ यांची घेतली भेट

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आज शनिवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांची मुंबईत भेट घेतली आहे. ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जात आहे.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजय डोवाल मुंबई दौऱ्यावर असून, त्यांनी वर्षा बंगल्यावर गणरायाचे दर्शन घेतले त्यांनी ही सदिच्छा भेट दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांनीही डोवाल यांची भेट घेतली आहे.

मुंबई स्थित राजभवनात ही भेट झाली असून, या भेटीदरम्यानचे फोटोही समोर आलेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि अजित डोवाल यांच्यात वेगवेगळ्या विषयांवर या भेटीदरम्यान चर्चा झाली. मात्र चर्चेत नेमके काय घडले, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. डोवाल यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली आहे. त्यानतंर त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आपल्या वेगवेगळ्या वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमी चर्चत असतात. दरम्यान, आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांनीच थेट कोश्यारी यांची भेट घेतल्याने तर्क वितर्कांना उधाण आले आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक ट्विट केले आहे. यातील एका फोटोमध्ये अजित डोवाल यांच्याकडून राज्यपालांना पुष्पगुच्छ देण्यात आल्याचे दिसून आले. तर दुसऱ्या फोटोमध्ये दोन्ही दिग्गजांमध्ये चर्चा होत असल्याचे पाहायला मिळाले. ही सदिच्छा भेट असल्याचे राज्यपालांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

मोदी, शहा मायानगरीत

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या 5 सप्टेंबरला मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. राज्यात भाजप सरकार आल्यानंतर हा त्यांचा पहिलाच दौरा असणार आहे. राज्यात होणाऱ्या आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील ही भेट महत्वाची ठरू शकते. मुंबई पालिकेवर कमळ फुलवण्यासाठी भाजपकडून विशेष प्रयत्न सुरू आहे.

कोण आहेत अजित डोवाल?

अजित डोवाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. ते 1968 च्या आयपीएस केडरचे अधिकारी असून, सैन्याकडून देण्यात येणार्‍या किर्ती चक्राने सन्मानित पहिले पोलिस अधिकारी आहेत. 2005 साली इंटेलिजेंस ब्युरोच्या प्रमुख पदावरून निवृत्त झाले होते. उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईकचे नियोजन आणि धोरण ठरवण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे.

बातम्या आणखी आहेत...