आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंगना विरोधात महाविकास आघाडी:NCB ने कंगनावर कारवाई करावी,  'तो' व्हिडिओ शेअर करत सचिन सावंतांनी एनसीबीकडे केली मागणी

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने तिची चौकशी सुरू करुन कारवाई करावी अशी मागणी सचिन सावंतांनी सोशल मीडियावर केली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोट नुकतीच मुंबईत परतली आहे. दरम्यान महाविकास आघाडी आणि कंगनातील वाद अद्यापही कमी झालेला नसल्याचे चित्र आहे. कारण काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी कंगनाचा ड्रग्सविषयीचा एक जुना व्हिडीओ ट्वीट केला आहे. कंगना मुंबईत परत आली आहे. आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने तिची चौकशी सुरू करुन कारवाई करावी अशी मागणी सचिन सावंतांनी सोशल मीडियावर केली आहे.

सचिन सावंत यांनी हा व्हिडिओ शेअर करत सोशल मीडियावर लिहिले की, 'NCB... ती परतली आहे. कंगनाच्या व्हिडीओविषयी तुम्ही तिला कधी फोन करणार आहात? असे असतानाही मोदी सरकारने तिला वाय (Y) दर्जाची सुरक्षा दिली पुरवलेली आहे. कारण ती बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेटसंबंधी माहिती देणार होती. मात्र, ती माहिती लपवतेय आणि तो मोठा गुन्हा आहे.' असेही सचिन सावंतांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटल आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर कंगना आणि महाविकास आघाडी सरकारमधील वाद पेटलेला पाहायला मिळतोय. हा वाद अजुनही शमलेला नाही. तिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यानंतर हा वाद सुरू झाला होता.

104 दिवसांनी मुंबईत परतली कंगना
कंगना रनोट एका मोठ्या ब्रेकनंतर मनालीहून मुंबईला परतली आहे. कंगना तिची थोरली बहीण रंगोली आणि भाचा पृथ्वीराज यांच्यासह मुंबई विमानतळावर दिसली होती. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावेळी अनेक सुरक्षा रक्षकसुद्धा त्यांच्यासह व्हिडिओमध्ये दिसले. कंगना 104 दिवसांनी मुंबईला परतली आहे. तत्पूर्वी, शिवसेनेशी झालेल्या वादामुळे कंगनाने 9 सप्टेंबरला मुंबई गाठली होती. पाच दिवस मुंबईत राहिल्यानंतर ती 14 सप्टेंबरला मनालीला रवाना झाली होती.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser