आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागाईविरोधात आंदोलन:केंद्र सरकारचे केवळ मंत्री नव्हे, तर पंतप्रधानच बदलण्याची गरज : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
नागपुरात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली भरपावसात सायकल यात्रा काढण्यात आली. - Divya Marathi
नागपुरात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली भरपावसात सायकल यात्रा काढण्यात आली.
  • पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस दरवाढीविरोधात काँग्रेसचे राज्यभरात आंदोलन

केंद्रातील मोदी सरकारने कृत्रिम महागाई निर्माण करून सामान्य जनतेला आर्थिकदृष्ट्या कमकुवत केले आहे. या सामान्य माणसाच्या वेदना दिल्लीच्या सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी तसेच सामान्य जनतेच्या हक्कासाठी ऊन-पावसाची तमा न बाळगता काँग्रेस पक्ष मोदी सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरला आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस व जीवनावश्यक वस्तूंच्या किमती भरमसाट वाढवल्याने सर्व प्रकारची महागाई वाढली असून लोकांचे जगणे मुश्कील झाले आहे. सरकारचे अपयश झाकण्यासाठी मंत्रिमंडळातील चेहरे बदलून चालणार नाही, तर पंतप्रधानच बदलण्याची गरज आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी केली.

इंधन दरवाढ व महागाईविरोधात काँग्रेसने राज्यातील सर्व महसुली आयुक्त मुख्यालयाच्या ठिकाणी सायकल रॅली काढून मोदी सरकारचा निषेध केला. नागपुरात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली भरपावसात सायकल यात्रा काढण्यात आली.

मुंबई, पुण्यासह राज्यात आंदोलन
नवी मुंबईमध्ये शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, मत्स्यसंवर्धनमंत्री अस्लम शेख, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. राज्यात नाशिक, पुणे नागपूर, औरंगाबादसह इतर शहरांत आंदोलन करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...