आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

राजभवनात कोरोना:मी क्वारंटाइन असल्याचं वृत्त खोटं, रिपोर्टही निगेटिव्ह आलाय, राज्यपाल कोश्यारींनी ट्विट करत दिली माहिती 

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यभरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. आता राजभवनही कोरोनाने शिरकाव केला आहे. येथील जवळपास 16 कर्मचाऱ्यांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वतःला क्वारंटाइन करून घेतल्याचं वृत्त होतं. त्यावर स्वतः राज्यपालांनी माहिती दिली आहे. आपण स्वतःला क्वारंटाइन केलं नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

राज्यपालांचं निवासस्थान व कार्यालय असलेल्या राजभवनात जवळपास 16 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त होतं. त्यानंतर मुंबई महापालिकेकडून या कर्मचाऱ्यांच्या पुन्हा एकदा चाचण्या करण्यात आल्या. तसेच राजभवनाचं सॅनिटायझेशनही करण्यात आलं आहे. दरम्यान, कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वतःला क्वारंटाइन केल्याचं वृत्त होतं. मात्र आता हे वृत्त खोटं असल्याचं ट्विट स्वतः भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. 

0