आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाकरेंचेच सरकार होते म्हणून आमच्यावर मनमानी कारवाई:बेकायदेशीर कृत्य न केल्यानेच आमची कोर्टात जमेची बाजू - सीएम

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

''आम्ही ठाकरे गट सोडताना सर्व गोष्टी कायद्याच्या अधीन राहून केल्या. कोणतीही बाब आम्ही बेकायदेशिरपणे केली नाही, म्हणून आज कोर्टात आमची बाजू जमेची ठरत आहे. ठाकरेंचे सरकार होते म्हणून त्यांनी हवी ती कारवाई आणि नोटीस आम्हाला चुकीच्या पद्धतीने दिली.'' असा घणाघात करुन सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निर्णयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. ते आज माध्यमांशी मुंबईत बोलत होते.

मी आधीपासून सांगत होतो

सीएम शिंदे म्हणाले, आम्ही सुरुवातीपासून मी सांगत आलो की, लोकशाहीत बहुमताला जास्त महत्व असते. आज लोकसभा, विधानसभेतही आमच्याकडे बहुमत आहे. त्यांना जी स्थगिती विरोधी पक्षाला हवी होती ती सुप्रीम कोर्टाने फेटाळली.

मनमानी चालत नाही

सीएम शिंदे म्हणाले, आता निवडणूक आयोगात ही लढाई लढली जाईल. काही निर्णय कोर्टात आणि काही निवडणूक आयोगात होत असते. नियम, कायदे, घटनेच्या आधारावर सर्व गोष्टी होत असतात. निवडणूक आयोग हा एक स्वतंत्र विभाग आहे. पण निवडणूक आयोगाचे मानायचेच नाही असा विरोधी गटाची भूमिका होती.

आमच्यावर चुकीच्या कारवाया

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, जो निर्णय आम्ही घेतला तो कायद्याविरुद्ध घेतला नाही. बेकायदेशिर घेतला नाही त्यामुळे आमची बाजू कोर्टात जमेची ठरत आहे. ज्या नोटीस आणि कारवाया केल्या त्या चुकीच्या होत्या. त्यावेळी मविआचे सरकार होते. वाटेल त्यानुसार आम्हाला नोटीस दिल्या. सुप्रीम कोर्टात ही बाब न्याय प्रविष्ठ आहे त्यामुळे मी त्यावर बोलणार नाही.

घटनातज्ज्ञांनाही आम्ही घेतलेला निर्णय कायद्यानुसार घेतला असे त्यांना वाटत होते.

बातम्या आणखी आहेत...