आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईसह राज्यातील सर्व महानगरपालिकांमधील स्वीकृत नगरसेवकांची संख्या वाढण्याबाबतचे विधेयक गुरुवारी (ता. २) विधानसभेत मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकांमधील स्वीकृत नगरसेवकांची संख्या ५ ऐवजी १० इतकी होणार आहे. हे विधेयक राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप करत विरोधकांनी या विधेयकाला विरोध दर्शवित हे विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी मंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील बदल करणारे विधेयक मांडले. मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक या मोठ्या महापालिकेत किमान १० स्वीकृत सदस्य असतील. तर इतर महापालिकेत एकूण सदस्य संख्येच्या १० टक्के किंवा १० यापैकी जी संख्या छोटी असेल त्यानुसार स्वीकृत सदस्यांची निवड होणार आहे.
विधेयक राजकीय हेतूने प्रेरित, विरोधकांची टीका यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ, काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण, अमिन पटेल, ठाकरे गटाचे रवींद्र वायकर यांनी आपली मते मांडली. राजकीय हेतूने प्रेरित हे विधेयक असल्याची टीका या सर्व आमदारांकडून करण्यात आली. तर शहरांचा गुणात्मक विकास व्हावा, या हेतूने हे विधेयक मांडल्याचे उदय सामंत यांनी भूमिका जाहीर केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.