आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • The Number Of Corona free Patients In The State Is On The Threshold Of One And A Half Lakh, While More Than One Lakh Patients Are Being Treated In The State, Read How Many Patients In Your District

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यासाठी दिलासा:राज्यातील जवळपास दीड लाख रुग्णांची कोरोनावर मात, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 55 टक्क्यांवर

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आज कोरोनाच्या 7827 नवीन रुग्णांचे निदान, तर 3340 जणांनी आज कोरोनावर केली मात

राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही २ लाख ५४ हजार ४२७ एवढी झाली आहे. मात्र यामध्ये दिलासादायक बाब म्हणते कोरोना रुग्ण वाढत असले तरीही कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. राज्यात आज ३३४० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.१५ टक्के असून आतापर्यंत एकूण संख्या १ लाख ४० हजार ३२५ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ७८२७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ३ हजार ५१६ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १३ लाख  १७ हजार ८९५ नमुन्यांपैकी २ लाख ५४ हजार ४२७ नमुने पॉझिटिव्ह (१९.३ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ८६ हजार १५० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४७ हजार ८०१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज १७३ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४.४ टक्के एवढा आहे.

राज्यात नोंद झालेले १७३ मृत्यू हे मुंबई मनपा-४४, ठाणे-६, ठाणे मनपा-२२, नवी मुंबई मनपा-१०, कल्याण-डोंबिवली मनपा-५, उल्हासनगर मनपा-१, भिवंडी-निजापूर मनपा-२, मीरा-भाईंदर मनपा-२, पालघर-१, वसई-विरार मनपा-७, रायगड-१, पनवेल मनपा-१, नाशिक-१, नाशिक मनपा-७, धुळे-२, जळगाव-२, पुणे-५, पुणे मनपा-२२, पिंपरी-चिंचवड मनपा-१०, सोलापूर मनपा-३, कोल्हापूर-१, रत्नागिरी-१, औरंगाबाद-१, औरंगाबाद मनपा-५, जालना-३, लातूर-१, बीड-१, नांदेड-३, अकोला मनपा-१, गोंदिया-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील व इतर राज्यातील १ अशी नोंद आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser