आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र कोरोना:राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 3 हजार 202 वर, नंदुरबार जिल्ह्यात आढळला पहिला कोरोना पॉझिटिव रुग्ण

मुंबईएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 3 हजारच्या वर, आतापर्यंत 195 रुग्णांचा मृत्यू

पुण्यात कोरोनामुळे आज 50 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. यासोबत पुण्यातील मृतांचा आकडा 50 वर पोहोचला आहे. तर राज्यात आतापर्यंत 195 लोकांचा बळी गेला आहे. दुसरीकडे रराज्य सरकारने 20 एप्रिलपासून शेतीशी संबंधित कामांना शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत पीक खरेदी संस्था, कृषी उपकरणे विक्री व दुरुस्ती दुकाने, बियाणे, खतांच्या दुकानांना व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात येणार आहे.

नंदुरबार जिल्हा गेल्या अनेक दिवसापासून ग्रीन झोन मध्ये होता परंतु काल नंदुरबार शहरातील एका 48 वर्षीय व्यक्तीला कोरोना आजाराचे लक्षणे दिसून आल्याने नंदुरबार जिल्हा रूग्णालयात गुरूवारी संध्याकाळी दाखल झाला. मालेगाव शहराची हिस्टरी असल्याची माहिती समोर आली आहे.जिल्हा रूग्णालयात दाखल झाला आहे. त्या रुग्णाचा अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासन खळबळ उडाली आहे. त्याचा परिसर संपूर्ण परिसर सील करण्याचे काम सुरू होणार आहे. अशी माहिती नंदुरबार जिल्हा रूग्णालयात प्रशासने दिव्य मराठी ला माहिती दिली.

कोरोना संक्रमित गर्भवती महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय बनवले

मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह गर्भवती महिलांसाठी स्वतंत्रपणे रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. मुंबईतील घाटकोपरच्या रजवाडी रुग्णालयात कोरोना संक्रमित गर्भवती महिलांवर उपचार केले जाणार आहेत. मुंबईत 30 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यानंतर, बीएमसीने गर्भवती महिलांसाठी स्वतंत्र उपचार करण्याची योजना आखली होती.

कोरोना अपडेट :

पुणे जिल्ह्यातील शिकारपूर गावात सोनोग्राफी केंद्राच्या डॉक्टरांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मागील 6 दिवसांत त्यांच्या सेंटरमध्ये आलेल्या लोकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. यामध्ये अनेक गर्भवती महिलांचा समावेश आहे. 

कोरोनाचे हॉटस्पॉट केंद्र बनलेल्या वरळी भागातील वाढत्या रुग्णांमध्ये एक दिलासाची बातमी आहे. वरळीच्या कोळीवाडात क्वारंटाइन केलेल्या 371 लोकांपैकी 129 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. या लोकांना पोद्दार हॉस्पिटल आणि विशाखा गेस्ट हाऊसमध्ये क्वारंटाइन करण्यात आले होते. सलग दुसऱ्या चाचणीत या 129 लोकांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 

राज्यात गुरुवारी २८६ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्ण संख्या ३,२०२ वर गेली आहे. राज्यात गुरुवारी ७ रुग्णांचा मृत्यू झाला. यात मुंबईच्या तिघांचा प पुण्याच्या चौघांचा समावेश आहे. राज्यातील कोरोना बळींचा एकूण आकडा १९४ वर पोहोचला आहे. दिवसभरात ५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३०० रुग्ण बरे झाले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. 

५२,७६२ नमुने कोरोना निगेटिव्ह 

राज्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर हा देशातील इतर राज्यांपेक्षा जास्त आहे. आजपर्यंत झालेल्या ५६ हजार ६७३ नमुन्यांपैकी ५२ हजार ७६२ जणांचे नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ७१,०७६ लोक होम क्वाॅरंटाइन, तर ६१०८ लोक संस्थात्मक क्वाॅरंटाइनमध्ये आहेत.

रुग्णांचा तपशील

मुंबई महानगरपालिका २०७३, ठाणे १३, ठाणे महानगरपालिका  १०९, नवी मुंबई ६८, कल्याण डोंबिवली ५०, उल्हासनगर १, भिवंडी निजामपूर १, मीरा भाईंदर ५१, पालघर ५, वसई विरार ३४, रायगड ६, पनवेल १२, नाशिक मंडळ ७९, पुणे मंडळ ४९२, कोल्हापूर मंडळ ३९, औरंगाबाद मंडळ  ३२, लातूर मंडळ १२, अकोला मंडळ ५४, नागपूर ६०, इतर राज्ये ११.

२०.५० लाखांवर लोकांचे सर्वेक्षण

क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजने अंतर्गत २९७ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून ५६६४ पथकांनी २०.५० लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केेले आहे. 

बातम्या आणखी आहेत...