आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'को’ रोना:मुंबईत कोराेनाबाधितांची संख्या कमी; पुणे, नागपूर, नवी मुंबईत रुग्णांमध्ये मोठी वाढ

मुंबईएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
मुंबईतील भाजी मंडईत लाेकांनी काही प्रमाणात गर्दी कमी केल्याचे शुक्रवारी आढळले. - Divya Marathi
मुंबईतील भाजी मंडईत लाेकांनी काही प्रमाणात गर्दी कमी केल्याचे शुक्रवारी आढळले.
  • मृतांच्या संख्येतही घट, धारावीतील कोरोनाग्रस्त वाढले, मुंबईत आकडा ७७ वर

गेल्या तीन दिवसांपासून मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होऊ लागल्याने मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळत आहे. मात्र, जे कोरोनारुग्ण सापडत आहेत त्यांची संख्या धारावीतच जास्त असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. शुक्रवारी मुंबईत ७७ नव्या रुग्णांची नोंद झाली. यापैकी १५ हे धारावीतील आहेत. मुंबईतील कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचा आकडाही गुरुवारपेक्षा कमी होऊन ५ वर आला आहे.

धारावीतील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता शंभरावर गेली असून तेथील मृतांचा आकडा दहा वर गेला आहे. एकीकडे धारावीत जरी कोरोनाग्रस्त वाढत असले तरी अन्य ठिकाणी कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होत आहे. गुरुवारी हा आकडा १०७ होता तर बुधवारी १८३ होता. कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले असून शुक्रवारी ३७ जण कोरोनामुक्त झाले. बुधवारी हा आकडा १७ होता आणि गुरुवारी २१ होता. आतापर्यंत मुंबईत २३९ कोरोनाग्रस्त बरे झाले आहेत.

नागपूर : कोरोना रुग्णांची संख्या ५९, दिवसभरात एक पॉझिटिव्ह

नागपूरजवळील लोणारा गावात होम क्वॉरंटाइन असलेल्या एकाची तपासणी पाॅझिटिव्ह आल्याने संख्या वाढून आता ५९ झाली आहे. या रुग्णाचे मरकज कनेक्शन असल्याचे सांगितले जाते. १४ रोजी कोरोना संख्या ५६ झाली होती. मंगळवारी एकाच दिवशी कोरोनाचे नऊ रुग्ण वाढले होते. १५ रोजी एकही अहवाल पाॅझिटिव्ह न आल्याने सर्वांनाच हायसे वाटले होते. गुरुवारी रविभवन येथे विलगीकरणात ठेवलेल्या दोघांचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने संख्या आता ५८ वर गेली. त्यातील १ अजमेर येथून तर दुसरा दिल्ली येथून आला होता. रविभवन, वनामती आणि आमदार िनवासात विलगीकरणाची व्यवस्था केली आहे.

नवी मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या पोहाेचली ५९ वर

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज आणखी ५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले आहेत. यामध्ये वाशीतील एपीएमसीतील धान्य मार्केटमधील एका व्यापाऱ्याचा आणि नेरूळ येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या एका नर्सचादेखील समावेश आहे. नवी मुंबईत आता रुग्णांची संख्या ५९ झाली आहे. काही दिवसांपूर्वी एपीएमसीतील मसाला मार्केटमधील एका व्यापाऱ्याला कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र, धान्य मार्केटमधील आणखी एका व्यापाऱ्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याने मार्केटची चिंता वाढली आहे. त्यामुळे हा व्यापारी राहत असलेला परिसर सील करण्यात आला आहे. 

पनवेल : ५ रुग्ण वाढले, श्रीवर्धनमध्ये एक

महापालिका क्षेत्रात शुक्रवारी ५ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रातील कोरोनाबाधितांची संख्या ३१ झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रातील तक्का येथील सरकारी रेशनिंग दुकानदाराची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. रायगड  जिल्ह्यात पनवेल महानगरपालिका आणि उरण तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळे असून उर्वरित तालुक्यांना कोरोनाची लागण झालेली नव्हती. मात्र, वरळी येथून श्रीवर्धन तालुक्यात आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

पुणे : पुण्यात काेराेनाचे अाणखी ४ बळी, दिवसभरात ६३ रुग्ण

काेराेना विषाणूचा फैलाव पुणे शहरात माेठया प्रमाणात झाला असल्याने दिवसेंदिवस मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढतच अाहे. शुक्रवारी ४ जणांचा  मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ५० पर्यंत पाेहचला अाहे. शुक्रवारी पुण्यात ६३ रुग्ण आढळले. गुलटेकडी येथे राहणाऱ्या ५० वर्षीय पुरुषाला ससून रुग्णालयात १२ एप्रिल राेजी काेराेनाची लक्षणे दिसून अाल्याने दाखल करण्यात अाले हाेते. मात्र, मधुमेह अाणि उच्च रक्तदाब हे त्रासही त्यांना असल्याने उपचारादरम्यान प्रतिकारशक्ती कमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. तर, लाेहियानगर परिसरातील ४४ वर्षीय पुरुषाला १३ एप्रिल राेजी ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात अाले हाेते. मात्र, मद्यपानामुळे त्यांचे मूत्रपिंड कमकुवत झाल्याने मल्टी ड्रग रेझिस्टंट प्लमाेनरी ट्यूबरक्युलाेसिस झाल्याने त्यांचा शुक्रवारी मृत्यू झाला. केवळ ससून रुग्णालयातच अातापर्यंत काेराेनामुळे ४१ जणांचा जीव गेला असून नागरिकांनी काेराेनापासून बचाव करण्यासाठी अपेक्षित खबरदारी बाळगणे गरजेचे असल्याचे मत अाराेग्य प्रशासनाने व्यक्त केले अाहे.

बातम्या आणखी आहेत...