आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रात कोरोना:राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 1761 वर, आज 187 नवीन रुग्णांची नोंद : आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • राज्यातील 208 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी, 1426 रुग्णांवर उपचार सुरू

राज्यात आज कोरोनाच्या 187 नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्ण संख्या 1761 झाली आहे. कोरोनाबाधित २०८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 1426 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 36 हजार 771 नमुन्यांपैकी 34 हजार 94 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 1761 जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 208 करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 38 हजार 800 व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून 4964 जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत. 

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात या प्रकारे एकूण 4641 सर्वेक्षण पथके  काम करत असून त्यांनी सतरा लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.  

आज राज्यात 17 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी मुंबईचे 12 तर पुणे येथील 2, सातारा, धुळे आणि मालेगाव येथील प्रत्येकी 1 आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी 11 पुरुष तर 6 महिला आहेत. आज झालेल्या 17 मृत्यूपैकी 6 जण हे 60 वर्षांवरील आहेत 8 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 60 या वयोगटातील आहेत तर तिघेजण 40 वर्षांपेक्षा लहान आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या 17 पैकी 16 रुग्णांमध्ये (94 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. यापैकी दोघांमध्ये क्षयरोग हा आजारही होता. 

कराडमध्ये एकाचा मृत्यू

साताऱ्यातील कराड येथे एका 54 वर्षीय रुग्णाचा शनिवारी मृत्यू झाला. या रुग्णाच्या कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर उपचार सुरू होते. आता साताऱ्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या दोन झाली आहे.

नागपुरात आणखी दोघांना कोरोनाची लागण

नागपुरात सतरंजीपुरातील दगावलेल्या करोनाग्रस्ताच्या संपर्कातील आणखी दोघांना विषाणूची लागण. यापूर्वी याच कुटुंबातील 6 जण पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे.

पुणे : ३८ नवीन रुग्ण 

जिल्ह्यात शुक्रवारी २ रुग्णांचा मृत्यू झाला. पुण्यात ३६, तर पिंपरी चिंचवडमध्ये २ असे एकूण ३८ नवीन रुग्ण आढळले. मृतांत एक ६७ वर्षीय मधुमेहग्रस्त महिला आहे. दुसरा रुग्ण नगर जिल्ह्यातील श्रीरामपूरचा ३० वर्षीय गतिमंद तरुण आहे. पुणे परिसरातील काेराेनाबाधितांचा आकडा २४६ वर पाेहोचला अाहे. 

राज्यातील रुग्णसंख्या

मुंबई १००८, ठाणे ३, ठाणे मनपा २८, नवी मुंबई ३२, कल्याण डोंबिवली  ३४, उल्हासनगर १, मीरा-भाईंदर २१, पालघर ३, वसई विरार १२, पनवेल ६, नाशिक मंडळ ३४, पुणे मंडळ २५४, कोल्हापूर मंडळ ३७, औरंगाबाद मंडळ १९, लातूर मंडळ १३, अकोला मंडळ ३४, नागपूर मंडळ २६ इतर राज्ये ९.

मिरज : २४ जण निगेटिव्ह

सांगली जिल्ह्यातील मिरज येथे कोरोनाचे २६ रुग्ण अाढळले होते. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी २४ रुग्णांची दुसरी चाचणी निगेटिव्ह आली. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित िवलासराव देशमुख यांनी रुग्णांवर उपचार करणाऱ्या पथकाचे अभिनंदन केले आहे.

अकोला : ४ रुग्ण : जिल्ह्यात शुक्रवारी ४ रुग्ण आढळले. तिघे एकाच कुटुंबातील आहेत. आधी आढळलेल्या रुग्णाच्या संपर्कात आल्याने या चौघांना लागण झाली. 

धुळे : पहिला बळी : २ जण पाॅझिटिव्ह निघाले आहेत. साक्रीच्या ५५ वर्षीय व्यक्तीचा शुक्रवारी मृत्यू झाला. दुसऱ्या २२ वर्षीय रुग्ण महिलेचीही प्रकृती गंभीर अाहे.

बातम्या आणखी आहेत...