आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र कोरोना:महाराष्ट्राची वाटचाल 2000 च्या दिशेने, आतापर्यंतचा आकडा 1982; आज सर्वात जास्त 22 जणांचा मृत्यू झाला

मुंबई3 वर्षांपूर्वीलेखक: प्रवीण पवार
  • कॉपी लिंक
मुंबईतील भाजी मार्केटमध्ये लॉकडाउनमध्येही अशी गर्दी जमत आहे - Divya Marathi
मुंबईतील भाजी मार्केटमध्ये लॉकडाउनमध्येही अशी गर्दी जमत आहे
  • 15 पेक्षा जास्त रुग्ण असलेल्या जिल्ह्यांना रेड झोनमध्ये ठेवण्यात आले आहे

देशातील सर्वात जास्त कोरोना प्रभावित राज्य महाराष्ट्र बनले आहे. राज्यात आतापर्यंत 1 हजार 982 प्रकरणे समोर आली आहे तर 149 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. संक्रमितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज राज्यात 221 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. तसेच, आज सर्वात जास्त 22 जणांचा मृत्यू झाला आहे. यात, 16 मुंबई, तीन पुणे, दोन नवी मुंबई आणि एकाचा सोलापूरमध्ये मृत्यू झाला.

दक्षिण मुंबईतील हॉटेल ताज महल पॅलेसमधील सहा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. ताज हॉटेलचे संचलन करणारी इंडियन हॉटेल्स कंपनी (आयएचसी) ने कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याची पुष्टी केली. 

यादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लॉकडाउन पार्ट-2 आता अजून कडक होणार असल्याचे संकेत दिले आहेत. संक्रमितांची साखळी तोडण्यासाठी राज्याची तीन झोनमध्ये वाटणी केली आहे.

संक्रमणाशी सामना करण्यासाठी 15 पेक्षा जास्त रुग्ण असलेल्या जिल्ह्यांना रेड झोनमध्ये. त्यापेक्षा कमी रुग्ण असलेल्या जिह्यांना ऑरेंज झोन आणि ज्या जिल्ह्यात एकही रुग्ण नाही अशा जिल्ह्यांना ग्रीन झोनमध्ये ठेवण्यात आले आहे. 

रेड झोन: मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नागपूर, रायगड, सांगली आणि औरंगाबाद.

ऑरेंज झोन: रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, उस्मानाबाद, बीड, जालना, हिंगोली, लातूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम आणि गोंदिया.

ग्रीन झोन: धुळे, नंदुरबार, सोलापूर, परभणी, नांदेड़, वर्धा, चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली.

बातम्या आणखी आहेत...