आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोविडपूर्व पातळी:आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांची संख्या कोविडपूर्व पातळी पार, मे महिन्यात विदेशी प्रवाशांची संख्या 22 लाखांवर

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोविडचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर भारतीय एअरलाइन्सने या वर्षी २७ मार्चपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू केली होती. यानंतर मे महिन्यात भारतीय एअरलाइन्समधून प्रवास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्या २२ लाखांवर गेली आहे. ती कोविडपूर्व म्हणजे मे २०१९ पासून २४% जास्त आहे.

मात्र, देशांतर्गत हवाई वाहतूक मेमध्ये कोविडपूर्व पातळीच्या तुलनेत ७% कमी राहिली. मेमध्ये देशांतर्गत प्रवाशांची संख्या १.१४ कोटी राहिली. पतमानांकन संस्था इक्राच्या अहवालानुसार, देशातील उड्डाणांचे संचालन सामान्य होत असताना २०२२-२३ दरम्यान प्रवासी वाहतुकीत अपेक्षित सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. मात्र, जेट इंधन(एटीएफ) महाग झाल्याने भारतीय विमान उद्योग पूर्वपदावर येण्यात अडचणी येऊ शकतात. दुसरीकडे, कोरोनाच्या संभाव्य नव्या लाटेचीही जोखीम आहे. इक्राचे उपाध्यक्ष आणि सेक्टर हेड सुप्रियो बॅनर्जी म्हणाले, भू-राजकीय मुद्द्यांमुळे एटीएफचे वाढलेले दर उद्योगासाठी आव्हानत्मक ठरले आहेत. इक्राने २०२२-२३ साठी भारतीय विमानतळांवर आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या वाढीची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...