आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिचारिकांचे आंदोलन स्थगित:राज्य सरकारकडून 15 जुलैपर्यंत ठोस उपाययोजनेचे आश्वासन

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

२३ मेपासून मुंबईत आझाद मैदानावर महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने आपल्या विविध १२ मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले होते. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी या संघटनेला मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात येत असल्याचे संघटनेच्या अध्यक्षा मनीषा शिंदे यांनी बुधवारी माध्यमांना सांगितले.

बाह्यस्त्रोतद्वारे परिचारिकांची करण्यात येणारी भरती बंद करण्यात यावी, नर्सिंग भत्ता ७ हजार २०० रुपये करण्यात यावा, धुलाई भत्ता वाढवण्यात यावा, पदवी शिक्षण घेतलेल्या परिचारिकांना केंद्राप्रमाणे वेतनवाढ द्यावी, पाळणाघर उपलब्ध करून द्यावे, विद्या वेतनामध्ये ५ हजाराची वाढ करण्यात यावी अशा बारा मागण्या परिचारिकांच्या संघटनेने सरकारला केल्या होत्या. परिचारिकांच्या संघटनेने २६ मे पासून राज्यभरात कामबंद आंदोलन सुरू केले होते. ३१ मे रोजी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याबरोबर या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक झाली. त्यामध्ये १५ जुलैपर्यंत संघटनेच्या मागण्यावर ठोस उपाययोजना करण्याचे मंत्र्यांनी मान्य केले आहे. परिचारिकांचे कामबंद आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात मागे घेण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...