आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'वंदे मातरम' म्हणणार नाही:अभियानाला सपा नेते अबू आझमींचा विरोध; शिंदे भाजपच्या दबावाखाली असल्याचा आरोप

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रात सपा नेते अबू आझमी यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना फोनवर हॅलो ऐवजी वंदे मातरम म्हणण्याच्या आदेशाला विरोध केला आहे. शासनाचा हा आदेश चुकीचा आहे. हिंदू-मुस्लिम यांच्यात तेढ निर्माण व्हावी म्हणून भाजपने जाणीवपूर्वक असा आदेश काढल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी म्हणाले की, आम्हाला देशावर प्रेम आहे, मात्र अल्लाहसमोर फक्त डोके टेकवायचे आहे. आम्ही वंदे मातरम् कधीच म्हणणार नाही. गांधी जयंतीपासून महाराष्ट्र सरकारने सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना फोनमध्ये हॅलो ऐवजी वंदे मातरम म्हणण्याचे आदेश दिले आहेत.

शिंदेंवर भाजपचा दबाव? - आझमी

अबू आझमी म्हणाले की, मला मुख्यमंत्र्यांना विचारायचे आहे की, तुम्ही नेहमी बाळासाहेबांप्रमाणे 'जय महाराष्ट्र' म्हणता, मग भाजप आणि आरएसएसच्या दबावाखाली ते का सोडायला सांगत आहात? 'जय महाराष्ट्र' म्हणणे हा देशद्रोह आहे का? असा खोचक सवाल अबू आझमी यांनी उपस्थित केला आहे.

अबू आझमींचा सवाल?

अबू आझमी म्हणाले की, हम सारे जहाँ से अच्छा हिन्दोस्ता हमारा बात है, जय हिंद बोलते है… यातून कुठेही देशाविरुद्ध द्वेष दिसून येतो का? जर कोणी खरा आस्तिक असेल तर तो देवाशिवाय कोणाकडेही झुकणार नाही आणि यात देशद्रोह नाही.

ठाकरेंच्या सरकारमध्ये केवळ भ्रष्टाचार - कदम

राम कदम म्हणाले की, राज्यात सरकार बदलेले आणि त्यांनी वंदे मातरम म्हणत संवाद सुरू करण्याचे ठरविले आहे. वंदे मातरम बोलण्यातून म्हणजे देशभक्ती दाखवण्याचा एक चांगला मार्ग आपल्याला भेटला आहे. उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये केवळ भ्रष्टाचार सुरू होता असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. तर दुसरीकडे वंदे मातरम म्हणून देशभक्ती दाखविण्यासाठी शिंदे - फडणवीस सरकारने चांगला मार्ग निवडला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...