आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • 13 ICU Patients Die As Fire Breaks Out At Vijay Vallabh Hospital In Maharashtra's Virar News And Update Story. The Family Said Bill Of Lakhs Was Made And There Was No Means To Extinguish The Fire.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विरार घटनेची प्रत्यक्षदर्शिनी:रुग्ण आगीमुळे मरत राहिले, नर्स फक्त पाहत राहिल्या; लाखोंचे बिल बनवतात, मात्र फायर स्प्रिंकलरही नव्हते

मुंबई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नर्स बाहेर तमाशा पाहत होत्या, आत 9 रुग्णांचा झाला होता मृत्यू

शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयाच्या दुसर्‍या मजल्यावरील आयसीयूमधील एसीमध्ये स्फोट झाला. यातून निघणारी ठिणगी आयसीयूमध्ये पडते आणि काही काळानंतर संपूर्ण वार्डात आग पसरते. आगीच्या वेळी आयसीयूमध्ये नर्स किंवा डॉक्टर नव्हते असा आरोप रूग्णाच्या कुटुंबियांनी केला आहे. जोपर्यंत रुग्णालयातील स्टाफला याची माहिती मिळेल संपूर्ण वार्डात धूर पसरला होता. अपघाताच्या वेळी आयसीयूमध्ये 15 रुग्ण व्हेंटिलेटरवर होते, त्यापैकी 13 जणांचा मृत्यू झाला आहे.

प्रत्यक्षदर्शीने सांगितले - ICU मध्ये फायर स्प्रिंकलरही नव्हते
एका प्रत्यक्षदर्शी अविनाश पाटील यांनी सांगितले की, ICU मध्ये अॅडमिट एका रुग्णाचे 3-4 लाख एवढे बिल येत आहे. मात्र सुविधांच्या नावावर काहीच मिळत नाही. येथे फायर सेफ्टी उपकरणही नव्हते. जर ICU मध्ये फायर स्प्रिंकलर असते तर आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवता येऊ शकते आणि एवढी मोठी घटना घडली नसती.

नर्स बाहेर तमाशा पाहत होत्या, आत 9 रुग्णांचा झाला होता मृत्यू
अविनाश यांनी सांगितले की, आग लागल्यानंतर ICU च्या बाहेर केवळ 3 नर्स उपस्थित होत्या आणि कोणताही डॉक्टर नव्हता. नर्स उभ्या राहून तमाशा पाहत होत्या. अविनाश पुढे सांगतात की, 'थोड्या वेळानंतर फायर ब्रिगेड घटनास्थळी पोहोचले आणि आग विझवण्यास सुरुवात केली. 4 वाजेच्या जवळपास धूर थोडा कमी झाला तर मी आत जाऊन पाहिले. आतमध्ये 9 लोकांनी बेडवरच प्राण सोडले होते आणि काही हे तडफडत होते. त्यांना आम्ही सर्वांनी मिळून कसेतरी बाहेर काढले. त्यामधील अनेकांनी 5 वाजेदरम्यान जीव सोडला. जे बचावले आहेत, त्यांचीही अवस्था गंभीर आहे. ते देखील नाजूक स्थितीत आहेत.'

अविनाश यांनी पुढे सांगितले, 'मला माझ्या मित्राने रात्री सव्वा 3 वाजता फोन करुन हॉस्पिटलमध्ये जाण्यास सांगितले. मी काही वेळातच येथे पोहोचलो आणि धावतच हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या ICU च्या बाहेर पोहोचलो. ICU चा दरवाजा उघडा होता, मात्र त्याच्या आतून खूप धूर निघत होता. मी आत शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र धुरामुळे तात्काळ आत जाणे शक्य झाले नाही.'

4 रुग्णांना बाहेर काढल्यानंतर आगीची माहिती मिळाली
पालघरचे जिल्हाधिकारी मानिक राव यांनी सांगितले की, ICU मध्ये एकूण 16-17 रुग्ण होते. ज्यामध्ये 4 आग लागल्यानंतरही स्वतःच बाहेर निघाले. त्यांना दुसऱ्या वार्डात शिफ्ट करण्यात आले. सर्वांची परिस्थिती स्थिर आहे आणि दुसऱ्या नॉन ICU पेशेंटही ठीक आहेत. हळुहळू सर्वांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात येत आहे.

मृतांची संख्या
1. उमा सुरेश कंगुटकर

2. निलेश भोईर

3. पुखराज वल्लभदास वैष्णव

4. रजनी आर कद्दू

5. नरेंद्र शंकर शिंदे

6. जनार्दन मोरेश्वर

7. कुमार किशोर किशोर दोशी

8. रमेश टी उपायन

9. प्रवीण शिवलाल गोदा

10. अमे राजेश राउत

11. रामा अन्ना म्हारे

12. सुवर्णा एस

13. सुप्रिया देशराज देशमुख

अपघातात आपल्या जवळच्या नातेवाईकाला गमावणाऱ्या सुमन रडत म्हणतात की, 'हॉस्पिटलमध्ये लिफ्ट दोन दिवसांपासून काम करत नव्हती. वार्डामध्ये आज विझवण्याचे कोणतेच नियोजन नव्हते. आग लागल्यानंतर रुग्णांना बाहेर काढण्याएवजी सर्व बाहेर उभे राहून तमाशा पाहत होते. कोणालाच आमची चिंता नाही, सर्व केवळ पैसे कमावत आहेत.'

बातम्या आणखी आहेत...