आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

वीज बील:लॉकडाउन काळातील 50 % वीज बील होणार माफ, मध्य प्रदेशात शिवराजसिंहांनी राबवलेला पॅटर्न राबवणार ठाकरे सरकार?

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिवराजसिंह चव्हान यांनी लॉकडाऊनच्या तीन महिन्याच्या काळातील वीज बिल 50 टक्के कमी केलं आहे

मुंबई | देशभरात कोरोना व्हायरसचा कहर आहे. जवळपास 3 महिने पूर्णपणे लॉकडाउन होते. यामुळे सर्वच उद्योग-व्यवसाय ठप्प झाले. अनेकांवर उपासमारीची वेळ आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांनाही याचा मोठा फटका बसला आहे. याच काळात आता वीज बिलाची चिंता नागरिकांना सतावू लागली आहे. या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी वीजबिलाबाबत राबवलेला पॅटर्न महाराष्ट्रातही राबवला जाणार का, या चर्चांना सुरूवात झाली आहे. 

महाराष्ट्रात आता वीज बिलाबाबत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हान यांनी राबवलेला पॅटर्न राबवणार असल्याची माहिती आहे. शिवराजसिंह चव्हान यांनी लॉकडाऊनच्या तीन महिन्याच्या काळातील वीज बिल 50 टक्के कमी केलं आहे. यानुसार एप्रिलमध्ये 100 रुपयांपर्यंत वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांना मे, जून आणि जुलैमध्ये फक्त 50 रुपये भरावे लागतील. तर जे ग्राहक 100 ते 400 रुपयांपर्यंत बिल भरत होते अशा ग्राहकांना केवळ 100 रुपये भरावे लागतील. तर 400 रुपयावरून अधिक बील देत असलेल्या ग्राहकांचं अर्ध वीज बिल माफ होणार आहे. न्यूज18 लोकमतने ही माहिती दिली आहे. 

0