आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • The Poddar School Bus In Santa Cruz Was Finally Found; All The Students Were Safe, The Driver Was Late Because He Did Not Know The Roads

पालकांचा जीव भांड्यात:सांताक्रूझमधील पोद्दार शाळेची बस अखेर सापडली; सर्व विद्यार्थी सुखरूप, चालकाला रस्ते माहिती नसल्याने झाला उशीर

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईच्या सांताक्रूझ परिसरातील पोद्दार शाळेची स्कूल बस बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. बस सापडत नसल्याने एकच गोंधळ उडाला होता. अखेर बस सापडली आहे. या शाळेच्या या बसमध्ये जवळपास 15 विद्यार्थी असल्याची माहिती आहे. चालकाला रस्त्यांची माहिती नसल्याने बसला पोहण्यासा दोन तास उशीर झाला होता. दोन तास उलटूनही विद्यार्थी घरी न पोहोचल्याने सर्व पालक शाळेत पोहोचले होते. यात चालकाचा मोबाईल बंद असल्याने पालक घाबरून गेले होते. मात्र, विद्यार्थी घरी पोहचल्यानंतर पालकांचा जीव भांड्यात पडला आहे.

पोद्दार शाळेची स्कूल बस हीदुपारी 12 वाजण्याच्या सुमारास विद्यार्थ्यांना घेऊन निघाली होती मात्र, सायंकाळी पाच वाजले तरी विद्यार्थी घरी पोहोचले नाही. त्यामुळे पालक घाबरून गेले होते. विद्यार्थ्यांना घेऊन बस घरी आली नाही. तर नेमकी गेली कुठे, असा प्रश्न पालकांना पडला होता. चालकाचा फोन स्विच ऑफ असल्याने पालक चिंतेत सापडले होते. काही अनुचित घडले तर नसेल, अशी भीती त्यांना सतावत होती. पण, अखेर बसचा पत्ता लागला असून विद्यार्थी सुरक्षित असल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितले.

रस्ते माहिती नसल्याने झाला उशीर -
शाळेचा आजचा पहिला दिवस आणि बस चालकही नवा होता. बस चालकाला रस्त्यांची माहिती नव्हती. त्यामुळे ठरलेल्या वेळेपेक्षा दोन तास बस उशीरा पोहोचली होती. या संपूर्ण प्रकरणावर पोलिस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले, की पुढील दोन दिवस या शाळेकडून बस बंद ठेवण्यात येणार असून जोपर्यंत चालकाला रस्ते माहिती पडणार नाहीत तोपर्यंत आणि त्यानंतर पुन्हा दोन दिवसांनी बसेस शाळेकडून सुरू करण्यात येणार आहेत. याशिवाय, बसचालकाची चौकशी होणार असल्याची माहिती परिवहन मंडळाचे मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...