आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • The President Should Give An Understanding To The Governor, Otherwise Bhagat Singh Koshyari Should Be Sent To Another State; Mahesh Tapase Demands Investigations

राष्ट्रपतींनी राज्यपालांना समज द्यावी:अन्यथा भगतसिंग कोश्यारी यांना दुसऱ्या राज्यात पाठवावे; महेश तपासेंची मागणी

मुंबई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहले आहे. राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्याने राज्याचे सामाजिक समीकरण बिघडत असून त्यांची तात्काळ महाराष्ट्राबाहेर बदली करावी किंवा समज द्यावी अशी मागणी तपासे यांनी राष्ट्रपतींकडे केली आहे. .

काय म्हणाले तपासे?
भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांचे रक्षण करणे व राज्यसरकारला वेळोवेळी मार्गदर्शन करणे हे राज्यपालांचे कर्तव्य आहे परंतु दुर्दैवाने राज्याचे राज्यपाल नेहमी चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात असा आरोपही महेश तपासे यांनी केला आहे.

राज्यपाल अशी वादग्रस्त विधान करत असल्याने सामाजिक समीकरण बिघडत आहेच शिवाय ते जनतेचा रोष ओढावून घेत आहे. मात्र राज्यपालांनी तसे करु नये असा सल्लाही महेश तपासे यांनी दिला आहे. दरम्यान राज्यपालांची तात्काळ महाराष्ट्राबाहेर बदली करावी अशी विनंती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना दिलेल्या पत्रात महेश तपासे यांनी केली आहे.

काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. औरंगाबादमध्ये झालेल्यश विद्यापीठाच्या कार्यक्रमात त्यांची जीभ घसरल्याचे दिसून आले. याआधी देखील त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. तर अनेकदा शिवरायांचा एकेरी उल्लेख राज्यनालांकडून करण्यात आल्याने संभाजीराजे छत्रपती यांनी कडक शब्दांत त्यांचा समाचार घेतला. राज्यभरात राज्यपालांच्या वक्तव्याने त्यांच्याविरोधी आंदोलन सुरू असल्याचे दिसून येत आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्ये करीत आहेत. परवा औरंगाबाद येथे झालेल्या विद्यापीठाच्या कार्यक्रमातही त्यांची जीभ घसरली होती. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसने थेट राष्ट्रपतींना पत्र पाठवलं आहे.

बातम्या आणखी आहेत...