आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील नायब तहसिलदारांचे प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहेत. राज्यातील नायब तहसिलदारांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येतील यासाठी लवकरच प्रशासनाची बैठक घेऊन मार्ग काढणार असल्याची ग्वाही राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. नायब तहसिलदारांच्या विविध मागण्याबाबतचे निवेदन स्वीकारल्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटनेच्यावतीने अहमदनगर येथील कार्यक्रमादरम्यान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना नायब तहसिलदारांच्या विविध मागण्याबाबतचे निवेदन देण्यात आले. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा करून मागण्या जाणून घेतल्या. यावेळी उपजिल्हाधिकारी संदीप चव्हाण प्रांताधिकारी,. गोविंद शिंदे तहसिलदार, कुंदन हिरे, अमोल निकम आदी उपस्थित होते. तालुकास्तरावरील नायब तहसिलदार हे अतिशय महत्त्वपूर्ण व जबाबदारीचे राजपत्रित वर्ग 2 चे पद आहे. त्यामुळे नायब तहसिलदारांच्या मागण्याबाबत शासन लवकरच प्रशासनाशी बैठक घेऊन मार्ग काढणार असल्याची ग्वाही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
अकोल्यात अधिकाऱ्यांचे आंदोलन
ग्रेड पे वाढविण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी साेमवारपासून महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेकडून कामबंद आंदोलन पुकारण्यात आले. आंदोलनत उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार असे एकूण 40 अधिकारी सहभागी झाले. मात्र आंदोलन काळात नैसर्गिक आपत्ती व कायदा आणि सुव्यवस्थेशीनिगडीत कामे सुरू आहेत.
40 अधिकाऱ्यांचा समावेश
महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेकडून पुकारण्यात आलेल्या आंदाेलनात 40 अधिकारी सहभागी झाले. यात उपजिल्हाधिकारी-5, तहसीलदार-10 आणि 25 नायब तहसीलदारांचा समावेश हाेता.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.