आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • The Process Of Issuing A Lookout Notice Against The Former Mumbai Commissioner Began, Parambir Singh Moved The High Court To Avoid Appearance; News And Live Updates

खंडणीचा आरोप:मुंबईच्या माजी आयुक्तांविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्याची प्रक्रिया सुरू; परमबीर सिंह यांची उच्च न्यायालयात धाव

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुढील तपासासाठी काहीही शिल्लक नाही - याचिकेत उल्लेख

मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तासह 28 जणांविरोधात ठाणे पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे परमबीर सिंग यांच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, परमबीर सिंह यांच्यावर खंडणीच्या पैशाचे रॅकेट चालवण्याचा आरोप आहे. तसेच अँटिलिया प्रकरणातील आरोप सचिन वाझेला सहकार्य केल्याबद्दल सिंग यांची मुंबई पोलिस आयुक्तांच्या पदावरुन हटवण्यात आले होते.

त्यानंतर सिंग यांना एप्रिल महिन्यात होमगार्डचे डीजी बनवण्यात आले होते. विशेष म्हणजे सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या महिन्याला 100 कोटी रुपये वसूलीचे आरोप केले होते.

परमबीर सिंह यांची उच्च न्यायालयात धाव
राज्य सरकारच्या चौकशीला आव्हान देण्यासाठी परमबीरने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. महाराष्ट्र सरकारने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपाची चौकशी करण्यासाठी माजी न्यायाधीश के. यू. चंदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग गठीत केले आहे. दरम्यान, आयोगाने परमबीर सिंह यांना आपले बयान नोंदवण्यासाठी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर सिंह यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

पुढील तपासासाठी काहीही शिल्लक नाही - याचिकेत उल्लेख
परमबीर सिंह यांनी याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यांनी याला आव्हान दिले आहे. आयोगाकडे सोपवलेल्या तपासाची व्याप्ती आधीच उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने ठरवली असल्याचे याचिकेत म्हटले आहे. तसेच या पुढील तपासासाठी काहीही शिल्लक नसल्याचे परमबीर सिंह यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत उल्लेख केला आहे.

बातम्या आणखी आहेत...