आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा"दोन सरकारे, मंत्र्यांच्या दोन समित्या, तरी वर्षांनंतर मुक्तिसंग्रामानंतर दमडीही मिळेना,'' अर्थसंकल्पात ७५ कोटी रुपयांची घोषणा केल्यानंतर पैसे दिलेच नसल्याचेवृत्त ‘दिव्य मराठी’ने एक मार्च रोजीप्रकाशित केले होते. त्यानंतर गुरुवारी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी, शासनाने ७५ कोटी रुपयेदेण्याची घोषणा केली. मात्र नवीन सरकारच्या उपसमितीने ना कार्यक्रम राबवले, ना मागील सरकारने घोषित केलेला निधी दिला नाही. १७ सप्टेंबर रोजी हे वर्ष सुरू होऊन साडेपाच महिने झाले. मात्र, आजवर ध्वजवंदनाशिवाय एकही कार्यक्रम झाला नसल्याची टीका राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान राज्य सरकारवर केली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राज्यपालांच्या अभिभाषणातील विसंगतीकडे सभागृहाचे लक्ष वेधले. ते म्हणाले की, अभिभाषणात, हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे होत असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे. मात्र, निधीची काहीच तरतूद केली नाही.
याच वर्षी घोषणा पूर्ण करण्याची मागणी स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षानिमित्त महाविकास आघाडी सरकारच्या अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीच्या नूतनी करणासाठी २५ कोटी दिले. मात्र, त्याला अजूनही उद्योग विभागाकडून प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही. अमृत महोत्सवी वर्षात झालेल्या घोषणा त्याच वर्षात पूर्ण व्हायला हव्यात, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली.
हुतात्म्यांना अभिवादन करणारा ठरावही मांडला नाही विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात हुतात्म्यांना अभिवादन करणारा साधा ठरावसुद्धा या राज्य सरकारला मांडता आला नाही. याबाबत महाविकास आघाडी सरकारच्या काळातील उपसमितीने हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे ७५वे वर्ष साजरे करण्यासाठी कार्यक्रमांची रूपरेषा आखली. ७५ कोटींच्या निधीची घोषणा केली. तो निधीही या सरकारने दिला नाही, अशी जोरदार टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी राज्य सरकारवर केली.
मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन नांदेडपर्यंत जोडावी मविआ सरकारच्या काळात जालना ते नांदेड समृद्धी महामार्गाचा निर्णय घेतला. नांदेडपासून पुढे हैदराबादपर्यंत नवीन महामार्ग उभारण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी आमची चर्चा झाली होती. ते सकारात्मक आहेत. यासंदर्भात राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावा करावा. त्याचप्रमाणे समृद्धी महामार्गालगत मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनला जालन्याहून नांदेडपर्यंत जोडावे. त्यामुळे मराठवाड्यातील प्रवाशांना काही तासांत मुंबईला पोहोचणे शक्य होईल, अशीही मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विधानसभेत केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.