आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मुंबई:भरपाईच्या रकमेवर पहिल्या पत्नीचाच हक्क; दोघींच्याही मुलांना मात्र समान वाटा : कोर्ट

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एएसआयचा कोरोनाने मृत्यू, भरपाईच्या रकमेवर दोघी पत्नींचा दावा

एखाद्या व्यक्तीच्या दोन बायकांमध्ये वाद झाल्यास कायदेशीररीत्या पतीच्या संपत्तीवर मालमत्तेवर पहिली पत्नीच दावा करू शकते. मात्र दोघी पत्नींच्या मुलांचा संपत्तीवर समान वाटा आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी एक प्रकरणावरील सुनावणीदरम्यान स्पष्ट केले.

उच्च न्यायालयाचे न्या.एस.जे.काठवाला आणि माधव जामदार यांच्या पीठात राज्य सरकारने औरंगाबाद खंडपीठाच्या एका निर्णयाचा उल्लेख केला. यात असाच निकाल देण्यात आला होता. उच्च न्यायालयाने सांगितले, कायद्यानुसार, दुसऱ्या पत्नीला काहीही मिळत नाही. मात्र दुसऱ्या पत्नीची मुलगी व पहिली पत्नी आणि तिच्या मुलीला समान वाटा मिळायला हवा.

काय होते प्रकरण

एएसआय सुरेश हतनकर यांचा ३० मे रोजी कोरोनाने मृत्यू झाला होता. महाराष्ट्र सरकारकडून कर्तव्यावर असलेल्या कोरोना योद्ध्यांच्या मृत्यूनंतर ६५ लाख रुपयांची भरपाई दिली जात आहे. भरपाईच्या या रकमेवर हतनकर यांच्या दोन्ही पत्नींनी दावा केला आहे. नंतर हतनकर यांच्या दुसऱ्या पत्नीची मुलगी श्रद्धाने कोर्टात याचिका दाखल करत भरपाईच्या रकमेचा वाटा मिळावा, अशी मागणी केली. राज्य सरकारच्या वकील ज्योती चव्हाण म्हणाल्या, सरकार कोर्टात रक्कम जमा करेल. यानंतर रक्कम कोणाला द्यावी हे कोर्टाने ठरवावे.