आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना प्रादुर्भाव:वेतन आयोग थकबाकीचा दुसरा हप्ता वर्षभर लांबला, काेरोनामुळे महसूल घटल्याने निर्णय

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • काेरोना आटोक्यात येईपर्यंत शाळा बंदच

कोरोना प्रादुर्भावामुळे शासनाचा महसूल घटल्यामुळे राज्य शासकीय कर्मचारी, इतर कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना १ जुलै २०२० रोजी देय असलेला सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा दुसरा हप्ता वर्षभर लांबणीवर पडला आहे. शासनाचे उपसचिव इंद्रजित गोरे यांनी यासंदर्भातील जीआर मंगळवारी जारी केला आहे. १ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर २०१८ कालावधीतील थकबाकी पाच वर्षात पाच समान हप्त्यात प्रदान केली जाणार आहे. त्यापैकी दुसरा हप्ता आता एक वर्ष लांबणीवर टाकण्यात आला आहे.

काेरोना आटोक्यात येईपर्यंत शाळा बंदच

- महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्याची जोपर्यंत खात्री पटत नाही, तोपर्यंत शाळा सुरू करण्याचा कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

- अनेक नॅशनल बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याची बाब समोर येत आहे. ज्या बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देणार नाहीत त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा गंभीर इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.

जूनमधील वीज बिलासाठी सुलभ हप्ते

मुंबई | लॉकडाऊनच्या कालावधीनंतर आता मीटर रीडिंग घेऊन जून महिन्याचे वीज बिल दिले जात आहे. महावितरणने घरगुती वीज ग्राहकांना बिल भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सवलत दिली आहे. प्रत्येक स्थानिक कार्यालयाकडून बिलांचे हप्ते पाडून देण्यात येतील.

बातम्या आणखी आहेत...