आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या ‘मिशन 144 ’ चा दुसरा टप्पा आजपासून सुरू:नड्डांची आज औरंगाबाद, चंद्रपुरात जाहीर सभा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत सोमवारी भाजपच्या “मिशन १४४’ च्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात चंद्रपुरातून हाेणार आहे. येथील सिव्हिल लाइनच्या न्यू इंग्लिश ग्राउंडवर त्यांची जाहीर सभा हाेईल. ते सायंकाळी ४ वाजता वेरूळ येथील घृष्णेश्वराचे दर्शन घेतील. त्यानंतर औरंगाबादला सायं. ५ वाजता मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा होईल. सायंकाळी भाजप पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक बैठक घेणार आहेत.

चार्टर्ड विमानाने सकाळी ११ वाजता चंद्रपूरच्या मोरवा विमानतळावर दाखल होतील. त्यानंतर चंद्रपूरचे आराध्य दैवत देवी महाकालीचे दर्शन घेणार आहेत.

१६ मतदारसंघांवर लक्ष
मिशन १४४ अंतर्गत भाजपने महाराष्ट्रातील १६ मतदारसंघावर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. त्यात चंद्रपूर, हिंगोली, बुलडाणा, औरंगाबाद, पालघर, कल्याण, दक्षिण-मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, रायगड, बारामती, शिरूर लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...