आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खर्च करण्याची क्षमता वाढली...:कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही महाराष्ट्राच्या उत्पन्नात 23%, तर खर्चात 25% वाढ; प्रॉपर्टी खरेदीच्या नोंदणीतून सर्वाधिक कमाई

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यांचा कर महसूल पहिल्या तिमाहीत दीडपट वाढला, भांडवली खर्चातही 133.4% वाढ

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही चालू वित्तवर्षाच्या पहिल्या तिमाहीत केंद्रच नव्हे तर राज्य सरकारांचेही उत्पन्न चांगलेच वाढले आहे. राज्यांच्या एकूण खर्चात ७६% हिस्सेदारी असलेल्या १६ प्रमुख राज्यांचा कर महसूल गततिमाहीत (एप्रिल-जून) ४४.७% वाढला आहे. महाराष्ट्राचे उत्पन्न २३%, तर खर्च २५% वाढला. राज्यांना सर्वात मोठा लाभ मुद्रांक शुल्क व नाेंदणीतून झाला. वित्तसेवा कंपनी मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या विश्लेषणानुसार, ओडिशा वगळता सर्व राज्यांत यात वाढ नोंदवली आहे. गुजरात व पंजाबमध्ये तर २००% वाढ झाली. छत्तीसगड, हरियाणा, केरळ, मध्य प्रदेश, राजस्थान व तेलंगणने पहिल्या तिमाहीत वर्षभराच्या महसूली तुटीच्या उद्दिष्टाचा एक चतुर्थांश वाटा पूर्ण केला आहे.

केंद्र-राज्यांचा महसूल ३९% घटला होता, आता ११५% जास्त
फायनान्शियल सर्व्हिसेसचे मुख्य अर्थतज्ज्ञ निखिल गुप्ता म्हणाले, गतवर्षी केंद्र व राज्य सरकारांचे एकूण उत्पन्न ३९% घटले होते. आता वार्षिक आधारे ११५% जास्त आहे.तथापि, केंद्र-राज्यांचा एकत्रित खर्च ९.४% वाढला. उत्पन्नाच्या तुलनेत कमी खर्चामुळे एकूण सरकारी महसुली तूट गेल्या तिमाहीत १७.६% उरली. ती गेल्या तीन वर्षांच्या सरासरी दरापेक्षा ४४% पेक्षा खूप कमी आहे.

उत्पन्नात वाढ, खर्चही वाढला; म्हणजे राज्यांत विकासकामे वेगाने
महसूल वाढीसोबतच राज्याच्या खर्चातही वाढ झाली आहे. राज्यांचा एकूण खर्च वार्षिक आधारे १८% वाढला. गतवर्षी याच कालावधीत तो ४.१% घटला होता. मात्र, यादरम्यान भांडवली खर्चात १३३.४% वाढ झाली. म्हणजे राज्यांनी विकासकामांसाठी बऱ्यापैकी खर्च केला आहे. या खर्चाचा परिणाम राज्यांच्या वित्तीय तुटीच्या रूपाने दिसून येत आहे. मात्र, झारखंड व ओडिशात ही वाढ दिसत नाही.

बातम्या आणखी आहेत...