आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना संसर्ग:मे अखेरपर्यंत दुसरी लाट संपेल, जुलै-ऑगस्टमध्ये तिसरी लाट : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा इशारा

मुंबई8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 25 लाख डोस मिळाले तर तिसऱ्या टप्प्याचे लसीकरण

जुलै-ऑगस्ट दरम्यान राज्यात कोरोना संसर्गाची तिसरी लाट येऊ शकते, असा साथरोगतज्ञांचा अंदाज असून त्यापूर्वी ऑक्सिजनमध्ये राज्य स्वयंपूर्ण करण्याची शासनाने तयारी चालवली आहे, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी पत्रकारांना दिली.

जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी सायंकाळी कोविड उपाययोजनेसंदर्भात दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक घेतली.

मेअखेरपर्यंत राज्यातील कोरोनाची दुसरी लाट संपलेली असेल असे सांगितले जात आहे. मात्र त्यानंतर लगेच एक-दीड महिन्यात कोराेनाची तिसरी लाट येण्याच्या अंदाजाने राज्यासमोरील अडचणी वाढणार आहेत. त्यादृष्टीने राज्यातील प्रत्येक तालुक्यात आॅक्सिजनचे आपण प्रकल्प उभे करत आहोत. आॅक्सिजनचा तुटवडा जाणवू नये यासंदर्भात आवश्यक उपकरणे व यंत्रे खरेदी करण्यात येत आहेत. जुलै महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी राज्य आॅक्सिजनमध्ये स्वयंपूर्ण होईल, असा दावा टोपे यांनी केला.

25 लाख डोस मिळाले तर तिसऱ्या टप्प्याचे लसीकरण
४५ वयाखालील नागरिकांसाठी राज्याला लस मिळवण्यात अनेक अडचणी येत आहेत. लसीची उपलब्धता देशात नाही. कमी लस पुरवठ्यामुळे गर्दी, गाेंधळ होऊ शकतो. म्हणून किमान २५ लाख लस मात्रा राज्याला प्राप्त झाल्याशिवाय आपण १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाचा प्रारंभ करणार नाही. त्यामुळे किमान १५ मेपर्यंत तरी या गटातील नागरिकांना लस टोचणे शक्य नाही, अशी माहिती टोपे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...