आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठी नववर्ष प्रारंभ आणि गुढी पाडव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. हे नववर्ष आशा, आकांक्षाचे नवे पर्व घेऊन येईल, असे मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे. मुख्यमंत्री म्हणाले ‘आपल्या सर्वांच्या एकजुटीमुळे एका बिकट परिस्थितीवर मात करू शकलो आहोत. निर्बंधातून मुक्त होऊ शकलो. हीच सज्जता, सतर्कता यापुढेही ठेवूया. अशा शुभेच्छा मुख्यंत्र्यांनी दिल्या. व कोरोनामुक्तीची पहाट घेऊन आलेला यंदाचा गुढीपाडवा आणि मराठी नववर्ष सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येऊदे, महाराष्ट्राच्या अभिमान, स्वाभिमान, एकजुटीची गुढी अशीच उंच उंच जाऊदे असे देखील म्हणाले.
गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची गुढी उभारली तसचे या गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर मराठी भाषा भवनाचे भुमिपूजन उद्धव ठाकरेंच्या हस्ते करण्यात आले. मराठी भाषा भवन मुंबई येथील चर्नी रोड वर उभारण्यात येणार आहे. तसेट मराठी भाषा भवन उभारण्यासाठी 126 कोटींचा निधी दिला. मुंबईसाठी आजोबा लढले, मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्याचे काम शिवसेनाप्रमुखांनी केले. आज मुख्यमंत्री म्हणून माझे नाव या इमारतीच्या भूमिपूजनाच्या पाटीवर लागले यापेक्षा माझ्या जीवनाचे दुसरे सार्थक असूच शकत नाही, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, मराठी भाषा विभागाचे राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार अरविंद सावंत, आमदार मंगलप्रभात लोढा, मराठी भाषा विभागाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. मातृभाषेच्या मंदिराचं भूमिपूजन करत आहोत. त्याची सुरुवात करत आहोत. त्याबद्दल आनंद देखील आहे.
भुमिपुजनावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, शिवसेना पक्ष प्रमुख आवाज बुलंद करण्याचे काम करते. तसेच हे भवन 7 मजली उभारण्यात येणार आहे.व सरकारी कारभार हा मराठीत चालला पाहिजे,जिथे अजित पवार तिथे मला येण्याची गरज नाही असे देखील म्हणाले. आपण भारतीय आहोच आपणच मराठी भाषेची ताकद ओळखायला पाहिजे. दरम्यान उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन कामाच्या गुढ्या उभारू शकत नाहीत, सरकार पाडण्याच्या गुढ्या मनातल्या मनात उभारल्या जाता आहेत. असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी भुमिपुजनाच्या वेळेस केले.
मराठी भाषेबाबत बोलण्यापेक्षा मराठी भाषेत बोला. भाषेवरून आमच्यावर टीका झाली. आताही होतेय. त्या टीकेला मी किंमत देत नाही. टीका करणारे काय किंमतीचे आहेत मला माहीत आहे. त्यामुळे मी किंमत देत नाही. शिवसेनाप्रमुखांवर टीका झाली होती. हे मराठी भाषेबद्दल बोलतात आणि यांची नातवंड इंग्रजी शाळेत शिकतात, अशी टीका करण्यात आली होती. आमची मुले इंग्रजी शाळेत शिकली. पण शिवसेना प्रमुखांनी पहिल्या दिवशी सांगितले होते इंग्रजी शाळेत आणि मराठी घरात असली पाहिजे.
भवन बघण्यासाठा जगभरातले पर्यटक आले पाहिजे - उद्धव ठाकरे
मराठी भवन बघण्यासाठी जगभरातील पर्यटक आले पाहिजेत असे मुख्यमंत्री म्हणाले. जगभरात अनेक भाषा बोलल्या जातात. पण आपल्या मातृभाषेचे भवन कसे असले पाहिजे आणि मुंबईत जाऊन बघून या असे इतर देशांनी म्हटले पाहिजे. असे देखाल ते म्हणाले. मुंबईत येणारा प्रत्येक पर्यटक इथे आलाच पाहिजे. मराठी भाषेचे वैभव आणि श्रीमंत त्याला समजली पाहिजे. या भाषेतील खजिना काही औरच आहे असे त्याला वाटले पाहिजे.
अत्याचार तर अजिबात सहन करणार नाही
राज्यात मराठी शिकली पाहिजे हा अत्याचार नाही, दुकानाच्या पाट्या इथे मराठीत असल्याच पाहिजेत. पण आपण जेंव्हा असा आग्रह धरतो आणि यामुळे ज्यांच्या पोटात दुखते त्यांच्या पोटदुखीचा उपचार करावाच लागेल. अटकेपार मराठी भाषेचा झेंडा नेणाऱ्या मराठी राज्याच्या राजधानीत मराठी भाषेला पुसण्याचं काम कुणी केलं तर त्याला धडा शिकवण्याची ताकत मराठी भाषेत आहेत. हे अत्याचार कदापि सहन केले जाणार नाहीत, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.
असे असेल मराठी भाषा भवन
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.