आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:जागतिक बाजारामुळे सेन्सेक्समध्ये 153  अंकांची घसरण

मुंबई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फेडरल रिझर्व्हच्या आगामी महत्त्वाच्या बैठकीत काय निर्णय येताे याकडे बाजाराचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे मंगळवारी गुंतवणूकदारांनी सावध राहून व्यवहार करण्यावर भर दिला. त्यातून जागतिक शेअर बाजारातील नरमाईचा परिणाम होऊन मंगळवारी सेन्सेक्समध्ये १५३ अंकांपेक्षा जास्त घसरण झाली. भांडवल बाजारातून विदेशी निधीचा आेघही बाहेर जात असल्याने त्याचाही परिणाम बाजारावर झाला. सेन्सेक्स १५३.१३ अंकांनी घसरून दिवसअखेर ५२,६९३.५७ अंकांच्या पातळीवर बंद झाला. दिवसभरात सेन्सेक्समध्ये ३८७.२२ अंकांची घसरण होऊन ताे ५२,४९५.४८ अंकांच्या पातळीवर आला होता. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी निर्देशांकातही ४२.३० अंकांची घसरण होऊन ताे १५,७३२.१० अंकांच्या पातळीवर बंद झाला. इंडसइंड बँक, टेक महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज, मारुती, हिंदुस्तान युनिलिव्हर, एचडीएफसी बँक, एशियन पेंट्स या समभागांना विक्रीचा मारा सहन करावा लागला. परंतु एनटीपीसी, अल्ट्राटेक सिमेंट, भारती एअरटेल, महिंद्रा अँड महिंद्रा या समभागांची चांगली खरेदी झाली.

बातम्या आणखी आहेत...