आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगभरातील शेअर बाजार घसरल्यामुळे शुक्रवारी देशातील बाजारातही विक्रीचा दबाव पाहायला मिळाला. सेन्सेक्स ८६६.६५ अंकाच्या नुकसानीसह ५४,८३५.५८ वर बंद झाला. निफ्टीत २७१.४० अंकांची घसरण राहिली. हा १६,४११.२५ वर बंद झाला. अमेरिकेच्या डाऊ जोन्स इंडेक्समध्ये १०६३.०९ अंक, हाँगकाँगच्या हेंगसेंग निर्देशांकात ७९१.४४ आणि जर्मनीच्या डॅक्स निर्देशांकात १९० अंकांची घसरण राहिली.
गेल्या एका महिन्यापासून सुरू असलेल्या घसरणीत सेन्सेक्स ५,७७६.१६ अंक (९.५३%) आणि निफ्टी १,६४२.१५ अंक (९.१०%) खाली आला आहे. ४ एप्रिल रोजी हा ६०,६११.७४ आणि १८,०५३.४० च्या पातळीवर होता. दुसरीकडे, या अवधीत अमेरिकी बाजाराच्या प्रमुख निर्देशांकात ४.३%-११.३% पर्यंत घसरण आली आहे. युरोपीय बाजार १.७२% ते ६.९१% कमकुवत झाले. आशियाई बाजार २.६४% ते ११.११% खाली आले. या घसरणीमागे ३ प्रमुख कारणे आहेत. जागतिक बाजारात विक्रीचा कल आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.