आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी पुरवठामंत्र्यांची घोषणा:मजीप्राच्या 13,118 कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग ऑक्टोबरपासून लागू होणार; 1 जानेवारी 2016 पासून लाभ

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कर्मचाऱ्यांना 1 ऑक्टोबरपासून सुधारित वेतनश्रेणी

राज्य शासनाच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. प्राधिकरणातील कार्यरत व सेवानिवृत्त अशा एकूण १३,११८ अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळणार अाहे. दिनांक १ जानेवारी २०१६ पासून सातव्या वेतन आयोगाचा लाभ देण्यात येईल.

प्राधिकरणातील सध्या कार्यरत असणाऱ्या २ हजार ११८ अधिकारी-कर्मचाऱ्यांना तसेच ११ हजार सेवानिवृत्त कर्मचारी अशा एकूण १३ हजार ११८ कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होईल. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिनांक १ जानेवारी २०१६ पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचना मंजूर करण्यात आलेली आहे. मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाच्या वेतनश्रेणीप्रमाणे वेतन व भत्ते अदा करण्यात येत होते. त्याच धर्तीवर सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत होती.

कर्मचाऱ्यांना १ ऑक्टोबरपासून सुधारित वेतनश्रेणी
१ ऑक्टोबर २०२१ पासून कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणीनुसार वेतन अदा करण्यात येईल. तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सुधारित निवृत्तिवेतन अदा करण्यात येईल. १ जानेवारी २०१६ ते ३१ मार्च २०१७ पर्यंतच्या वेतनाची थकबाकी प्राधिकरणामार्फत तर १ एप्रिल २०१७ ते ३० सप्टेंबर २०२१ या कालावधीतील थकबाकी शासनामार्फत टप्प्याटप्प्याने अदा करण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...