आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्तासंघर्ष:शिंदे गटाने सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचा बदलला पत्ता

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने प्रतिशिवसेना भवन उभारण्याच्या चर्चेनंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्का देण्यासाठी पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचा पत्ता बदलला आहे. दादरमधील शिवसेना भवना ऐवजी ठाण्यातील आनंद आश्रम हा पत्ता शिंदे गटाने लेटर हेडवर छापला आहे. शिंदे गटाकडून जाहीर झालेल्या नियुक्त्यांच्या पत्रावर हा नवा पत्ता आहे. आनंद आश्रम हे धर्मवीर आनंद दिघे यांचे स्मृतीस्थळ आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात मध्यवर्ती कार्यालय नेण्याचा घाट शिंदेंनी घातला आहे. शिंदे गटाकडून जाहीर करण्यात आलेल्या नियुक्तीपत्रांवर ठाण्यातील टेंभी नाका भागातील आनंदाश्रमाचा पत्ता आहे. आतापर्यंत दादरच्या शिवसेना भवनाचा उल्लेख शिवसेना मध्यवर्ती कार्यालय म्हणून असायचा. मात्र शिंदे गटातील नेते यशवंत जाधव यांची मुंबईतील विभागप्रमुख म्हणून झालेल्या नियुक्तीच्या पत्रावर ‘आनंद आश्रम, श्री भवानी चौक, टेंभी नाका, ठाणे पश्चिम’ असा पत्ता आहे.

बातम्या आणखी आहेत...