आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गनिमी कावा:विमानाचा वापर न करता रातोरात कारने शिवसेना आमदार सुरतला

मुंबई4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधान परिषदेला मतदान केल्यानंतर सुरत गाठायचे हे निश्चित होते, तसे नियोजन एकनाथ शिंदे यांनी पवईच्या हाॅटेल वेस्ट इनमध्ये केले होते. त्याबरहुकूम मुंबई ते सुरत हा प्रवास उघड होऊ नये म्हणून विमानाचा वापर न करता कारने रातोरात प्रवास करत दोन टप्प्यांमध्ये मंगळवारी (२१ जून) पहाटे शिवसेनेच्या ३५ आमदारांसह एकनाथ शिंदे सुरतच्या हाॅटेल ला मेरिडियन हाॅटेलमध्ये पोहोचल्याचे समजते.

विधान परिषदेच्या मतदानासाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांना पवईच्या हाॅटेल वेस्ट इनमध्ये ठेवले होते. याच हाॅटेलमध्ये सेनेचे चाणक्य विधान परिषदेच्या मतदानाची रणनीती आखत होते. त्याच वेळी सेनेचे विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांच्या डोक्यात सुरतचा प्लॅन सुरू होता.

रात्री ११ आमदारांचा पहिला जथ्था निघाला रात्री ९.३० वाजता आमदारांचा पहिला जथ्था ११ सुरतच्या हाॅटेलला मेरिडियन येथे पोहोचला. तेथे पूर्वीच ११ रूम बुक करून ठेवल्या होत्या. बंडाचे नेते एकनाथ शिंदे कारने मंगळवारी पहाटे १.३० वाजता हाॅटेलवर आले. त्यांच्यासोबर १२ ते १३ शिवसेनेचे आमदार होते. त्यानंतर इतर आमदारही मागून पोहोचले.

खा. डॉ. श्रीकांत शिंदे कुटुंबासह अमेरिकेत एकनाथ शिंदे हे ठाण्यातील माजीवडा येथे राहतात. शिंदे याचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे कल्याणचे शिवसेना खासदार आहेत. दोन दिवसांपूर्वी श्रीकांत यांना यूएसएला कुटुंबासह पाठवल्याचे समजते. ठाण्यात कडवट शिवसैनिकांची मोठी संख्या आहे. त्यामुळे शिंदे यांनी तशी खबरदारी घेतल्याचे समजते.

बातम्या आणखी आहेत...