आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिंचन प्रकल्प:रखडलेले सिंचन प्रकल्पतीन वर्षांमध्ये होणार पूर्ण; नितीन गडकरी, जयंत पाटील यांची दिल्लीत बैठक

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना व तांत्रिक अडचणींमुळे राज्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प ३ वर्षांत पूर्ण करण्यात येतील. विदर्भातील गोसीखुर्दसह सर्व प्रकल्प येत्या २ ते ३ वर्षांत मार्गी लावले जातील, अशी माहिती राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी बुधवारी दिली. जलसंपदा विभागाची महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीत पार पडली. त्यात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय जलसंपदामंत्री गजेंद्रसिंह शेखावत, राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित हाेते.

पंतप्रधान आणि बळीराजा योजनेतून तसेच राज्याच्या जलसंपदा विभागाचे चालू प्रकल्प पुढील २ ते ३ वर्षांत पूर्ण केले जातील. त्यासंदर्भात निधी देण्याबाबत चर्चा झाली. प्रकल्प गतीने पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारच्या व्याख्येत ते प्रकल्प बसवण्यात येणार आहेत, असे जयंत पाटील म्हणाले. पंतप्रधान सिंचन योजनेत २८, तर बळीराजात ९६ प्रकल्प आहेत. ते पूर्ण करण्यासाठी ७५% नाबार्डचे कर्ज दिले आहे. त्याच्या २% व्याजाची पूर्तता केंद्र करते. तसेच २५% केंद्राचे अनुदानही आहे. केंद्राने दिलेला निधी परत निधी वाटपातील अटींमध्ये राज्यात अडकतो. म्हणून केंद्राचा निधी थेट देण्याचे आदेश आहेत. केंद्र यापुढे राज्याकडे निधी देण्याऐवजी थेट जलसंपदा विभागाला देईल. त्यामुळे निधी हस्तांतरणातील चारपाच महिन्यांचा वेळ वाचेल. परिणामी प्रकल्प कमी वेळेत पूर्ण होतील, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

राज्यपालांचे पत्र अडचणीचे
सिंचन निधी वाटपाबाबत राज्यपालांचे एक वैधानिक पत्र गोसीखुर्दसाठी अडचण ठरले आहे. मात्र, मी राज्यपालांना भेटून प्रकल्पावर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी यादीतून हा प्रकल्प बाहेर ठेवला आहे. केंद्राकडून निधी मिळणाऱ्या प्रकल्पांना राज्यपालांची परवानगी आवश्यक नसते, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या वेळी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...