आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्य सरकारच्या कामावर समाधानी असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी व्यक्त केले आहे. राज्य सरकार पडणार याबद्दल नारायण राणे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे अनेकदा नव्या तारखा देत असतात असा टोला त्यांनी भाजपला लगावला असून ठाकरे सरकार 5 वर्षे पूर्ण करणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तर त्यानंतरही महाविकास आघाडीचे सरकार असणार आहे असे शरद पवारांनी म्हटले आहे. त्यांचे वक्तव्य आम्ही एन्जॉय करतो असे म्हणत शरद पवारांनी पाटील आणि राणेंना टोला लगावला आहे.
साखर कारखाने बंद करु नका - शरद पवार
राज्यात उस उत्पादक शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्यांच्यावर असे संकट ओठावू नये म्हणून शेतकऱ्यांचा उस घेत साखर कारखाने सुरू ठेवावे असे पवारांनी म्हटले आहे. तर शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी हार्वेस्टरच्या सहाय्याने उसाची तोडणी करावी, यांत्रिकीकरणचा अवलंब करावा असेही पवार म्हणाले. तर देशातील सहकार क्षेत्रास महाराष्ट्र आणि गुजरातचा मोठा वाटा असल्याचे पवारांनी म्हटले आहे. सुटबुट घातलेल्या व्यक्तीला खुर्ची पण लंगोटवाल्या शेतकऱ्यांना बँका साधे विचारतही नाही असे पवार यावेळी म्हणाले आहे.
केतकी प्रकरणी शरद पवार काय म्हणाले ?
नेमकी काय भाष्य केले या प्रकरणी मला माहिती नाही. माहिती नसताना त्यावर बोलणे योग्य नसल्याचे शरद पवारांनी म्हटले आहे. मी एका कवितेचा उल्लेख केला, काही लोकांनी त्यांचा विरऱ्यास केला गेला, असे शरद पवारांनी म्हटले आहे
राज्यसभा निवडणुकासंदर्भात वक्तव्य
राज्यसभेसाठी आमचे तिनही पक्ष एकत्र निवडणुक लढवणार आहोत असे पवारांनी म्हटले आहे. आमच्याकडे उमेदवार निवडून आल्यावरही काही मते जास्तीची आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.