आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरोग्य:राज्याचा आरोग्य विभाग खरेदी करणार 46 हजार स्मार्टफाेन; आशा स्वयंसेवक, गट प्रवर्तक यांच्यासाठी खरेदी

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाची योग्य अंमलबजावणी व्हावी, या हेतूने राज्याच्या आरोग्य विभागाने आशा स्वयंसेवक आणि गट प्रवर्तक यांना स्मार्टफोन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ४५ हजार ७८३ स्मार्टफोन खरेदी करण्यात येणार आहेत.

राज्यातील आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक आरोग्य विभागाकडील विविध कार्यक्रमांची गावात व वाडी वस्तीवर अंमलबजावणी करत असतात. त्या करत असलेल्या कामांसाठी आरोग्य विभागाने एक सॉफ्टवेअर तयार केले आहे. त्यात रिअल टाइम डेटा भरणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व आशा स्वयंसेवक आणि गट प्रवर्तक यांना स्मार्टफोन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

एका फोनसाठी ८ हजार रुपये मोजले जाणार आहेत. ४५ हजार ७८३ फोनसाठी ३६ कोटी ६२ लाख ६४ हजार रुपये इतक्या रकमेची तरतुद करण्यात आली आहे. स्मार्टफोनमुळे आरोग्य अभियानाचा डेटा तत्काळ मिळणार आहे. त्यामुळे योग्य व लवकर उपाययोजना करणे शक्य होणार आहे. फोन खरेदीसाठी निविदा काढली जाणार आहे.