आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाशी युद्ध:राज्याला सध्या 400 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज, संबंधितांना ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा याबाबत आरोग्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यात ऑक्सिजन उत्पादन क्षमता 1081 मेट्रिक टन एवढी आहे

कोरोनाच्या काळात अनेक गंभीर रुग्णांना उपचारासाठी औषधांची आवश्यकता आहे. प्रत्येक गरजू रुग्णास वेळेवर ऑक्सिजन मिळावा तसेच औषधांचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहावा यासाठी उपाययोजना करण्यात येत असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

राष्ट्रीय ऑक्सिजन उत्पादक संघटनेच्या अध्यक्षांसोबत टोपे यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नुकतीच बैठक झाली. या वेळी टोपे यांनी संबंधितांना ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा याबाबत निर्देश दिले आहेत. सध्या राज्यात ऑक्सिजनची गरज ४०० मेट्रिक टनाची आहे, तर उत्पादन क्षमता १०८१ मेट्रिक टन एवढी आहे. राज्यात सध्या जम्बो सिलिंडरचा साठा १७७५३ एवढा आहे. बी टाइप सिलिंडर १५ हजार ४७३ एवढे आहेत. ड्युरा सिलिंडर २३० एवढे आहेत. लिक्विड क्रायोजनिक ऑक्सिजन टँक १४ आहेत.

जिल्हास्तरावर कंट्रोल रूम :

जिल्हास्तरावर आपत्ती व्यवस्थापनअंतर्गत पावसाळ्यासाठी स्थापन कंट्रोल रूमकडे ऑक्सिजन पुरवठ्याबाबतही जबाबदारी देण्याचे निश्चित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या कंट्रोल रूम ३१ डिसेंबर २०२० पर्यंत सुरू राहणार आहेत. राज्यस्तरावर अन्न व औषध प्रशासनामार्फत कंट्रोल रूम सुरू करण्यात आली आहे. या कंट्रोल रूमचा दूरध्वनी क्रमांक ०२२२२६५९२३६४ आहे, तर टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ आहे.

राज्यात पुरेशा ऑक्सिजन बेडसाठी निर्देश

राज्यात आढळणाऱ्या कोरोना रुग्णांपैकी सरासरी किती रुग्णांना ऑक्सिजन बेड लागतात याचा विश्लेषणात्मक आढावा घेऊन प्रत्येक जिल्हा आणि महानगरपालिका क्षेत्रात ऑक्सिजन बेड उपलब्ध राहावेत यासाठी योग्य ती कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. ऑक्सिजन पुरवठा नियंत्रणासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.