आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र कोरोना:राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 3 हजारांपेक्षा जास्त, औरंगाबादमध्ये 3 तर पुण्यात आज 65 नवे कोरोनाबाधित सापडले

मुंबईएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
लॉकडाऊनमध्ये लक्ष ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांकडून ड्रोनसारख्या आधुनिक उपकरणे वापरली जात आहेत. - Divya Marathi
लॉकडाऊनमध्ये लक्ष ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांकडून ड्रोनसारख्या आधुनिक उपकरणे वापरली जात आहेत.
  • मुंबईत कमी, तर पुण्यात वाढला मृतांचा आकडा

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या तीन हजारांवर गेली आहे. आज मुंबई 107, पुणे 65, ठाणे 13, नागपूर 11 नवीन मुंबई आणि वसई-विरारमध्ये प्रत्येकी 2, पिंपरी-चिंचवड आणि मालेगाव, अहमदनगर, चंद्रपूर आणि पनवेलमध्ये प्रत्येक 1 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा समावेश आहे. यासोबत राज्यातील संक्रमितांची संख्या 3081 वर पोहोचली आहे. पुण्यात रात्री उशिरा एका 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. यासोबत पुण्यात आतापर्यंत कोरोनामुळे 44 लोक मृत्युमुखी पडले आहेत. यासोबतच राज्यातील बळींची आकडा 193 वर पोहोचला आहे. 

औरंगाबादमध्ये आणखी 3 कोरोना पॉझिटिव्ह, एकूण 28 कोरोनाग्रस्त

औरंगाबादमध्ये कोरोनाचे आणखी दोन नवे रुग्ण सापडले आहेत. यात बायजीपुरा परिसरातील गर्भवती आईचा देखील समावेश आहे. रिपोर्ट आल्याने आता या महिलेला जिल्हा रुग्णायलायतून घाटीमध्ये हलवण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर प्रदीप कुलकर्णी यांनी दिली आहे. तर दुसऱ्या रुग्णाचे वय 39 वर्षे आहे. तर बिस्मिला कॉलॉनीतील एका 65 वर्षाची महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या महिलेची प्रकृती गंभीर असून तिच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. औरंगाबादेत यासोबतच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 27 वर पोहोचली आहे.

राज्यात बुधवारी २३२ कोरोना रुग्ण वाढले. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २ हजार ९१६ वर गेली आहे. ९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यापैकी मुंबईत २, पुण्यात ६ आणि अकोल्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. बुधवारी झालेल्या ९  मृत्यूंपैकी ४ जण हे ६० वर्षांवरील आहेत. ३ रुग्ण हे ४० ते ६० या वयोगटातील आहेत.  दोघे ४० वर्षांखालील आहेत. मृत्युमुखी पडलेल्या ९ जणांपैकी ६ रुग्णांमध्ये   मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १८७ वर गेली आहे.  बुधवारपर्यंत राज्यात २९५ रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

बुधवारपर्यंत ५२ हजार नमुन्यांपैकी ४८,१९८ जणांचे नमुने निगेटिव्ह आले. सध्या राज्यात ६९,७३८ जण होम क्वाॅरंटाइन, तर ५,६१७ जण संस्थात्मक क्वाॅरंटाइनमध्ये आहेत. राज्यातील ज्या भागात रुग्णांची साखळी सापडली आहे  त्या ठिकाणी केंद्राच्या मार्गदर्शनानुसार ‘क्लस्टर कंटेनमेंट’ कृती योजना अमलात आणली जात आहे. राज्यात एकूण ५,३९४ सर्वेक्षण पथकांनी २० लाखांहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. 

राज्यातील रुग्णांचा तपशील

मुंबई १८९६, ठाणे  १२, ठाणे मनपा- ९७, नवी मुंबई  ६८, कल्याण-डोंबिवली  ५०, उल्हासनगर १, भिवंडी-निजामपूर १, मीरा-भाईंदर ५१, पालघर ५, वसई- विरार  ३२, रायगड ५, पनवेल १०, नाशिक मंडळ ८३, पुणे मंडळ ४१५, कोल्हापूर मंडळ  ३९, औरंगाबाद मंडळ २५, लातूर मंडळ १३, अकोला मंडळ ४६, नागपूर ५६, इतर राज्ये- ११.

बातम्या आणखी आहेत...